किडनी आणि लिव्हरसाठी घातक आहे दुधात टाकलेला यूरिया, FSSAI ने सांगितलं भेसळ कशी ओळखाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 09:25 AM2024-06-27T09:25:43+5:302024-06-27T09:30:38+5:30

दुधात यूरिया मिक्स केला जातो. ज्यामुळे आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं. अशात FSSAI ने भेसळयुक्त दूधची ओळख कशी पटवाल याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Urea in milk is dangerous for kidney and liver, FSSAI told how to recognize adulteration! | किडनी आणि लिव्हरसाठी घातक आहे दुधात टाकलेला यूरिया, FSSAI ने सांगितलं भेसळ कशी ओळखाल!

किडनी आणि लिव्हरसाठी घातक आहे दुधात टाकलेला यूरिया, FSSAI ने सांगितलं भेसळ कशी ओळखाल!

How To Detect Urea In Milk: दुधाचा वापर जास्तीत जास्त लोक रोज वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात. कुणी दुधाचा चहा पितात तर कुणी दूध पितात. दूध एक परिपूर्ण आहार मानलं जातं. कारण यात अनेक पोषक तत्व असतात. याने शरीराला शक्ती मिळते. हाडे मजबूत होतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. पण आजकाल दुधात भेसळ होण्याच्या अनेक घटना समोर येत असतात. दुधात यूरिया मिक्स केला जातो. ज्यामुळे आरोग्याचं खूप नुकसान होऊ शकतं. अशात FSSAI ने भेसळयुक्त दूधची ओळख कशी पटवाल याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत.

दुधात यूरियाची भेसळ

दुधात प्रोटीनचं प्रमाण वाढवलेलं दाखवण्यासाठी यूरिया मिक्स केला जात आहे. ज्याचा आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडत आहे. पण मोठी अडचण ही आहे की, दुधात यूरिया आहे याची ओळख पटवणं अवघड आहे.

यूरिया काय असतो?

यूरिया कार्बामाइड नावानेही ओळखला जातो. हा कार्बोनिक अॅसिडचं डायमाइड रूप असतो. याचा वापर शेतात पिकासाठी केला जातो. यूरियाचा कोणताही रंग नसतो. हा एक गंधहीन, चव नसलेला आणि विषारी केमिकल आहे.

दुधात का टाकतात यूरिया?

यूरिया दुधात नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी मिक्स केला जातो. ज्यामुळे दुधात प्रोटीनचं प्रमाण वाढलेलं दिसतं. यामुळे दूध विकणारे दुधात पाणी मिक्स करून दूध विकतात. पण हे आरोग्यासाठी नुकसानकारक आहे.

यूरियामुळे काय होतं नुकसान

- मळमळ आणि उलटी

- शरीरात पाणी कमी होणं

- जुलाब आणि डायरिया

- किडनी खराब होणे

- लिव्हर खराब होणे

- प्रजनना संबंधी समस्या

कसं ओळखाल दुधात यूरिया आहे

दुधात यूरिया आहे का हे जाणून घेण्याची एक सोपी पद्धत आहे. यासाठी एका टेस्ट ट्यूबमध्ये २ चमचे दूध टाका आणि यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर डाळीचं पावडर टाका. हे चांगलं मिक्स करा आणि ५ मिनिटानंतर या मिश्रणात लाल लिटमस पेपर टाका. ३० सेकंद वाट बघा. जर लिटमस पेपरचा रंग निळा झाला असेल तर दुधात भेसळ आहे. जर रंग बदलला नाही तर दूध शुद्ध आहे. 

Web Title: Urea in milk is dangerous for kidney and liver, FSSAI told how to recognize adulteration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.