युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:30 AM2020-05-15T11:30:04+5:302020-05-15T11:30:47+5:30

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं.

Uric acid causes treatment diet reduce uric acid level naturally myb | युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

युरिक अ‍ॅसिडचं वाढतं प्रमाण ठरू शकतं गंभीर आजारांचं कारण, वाचा नियंत्रणात ठेवण्याचे उपाय

googlenewsNext

शरीरात युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढलं की गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. शरीरात प्यूरिनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. साधारणपणे आपलं शरीर हे किडनीमार्फत युरिक अ‍ॅसिड फिल्टर करत असतं. जर तुम्ही प्यूरिनचं सेवन मोठ्या प्रमाणावर करत असाल तर शरीराला हे अ‍ॅसिड फिल्टर करण्यासाठी अडचणी येतात. या स्थितीला Hyperuricemia असं सुद्धा म्हटलं जातं. यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. आज आम्ही तुम्हाला युरिक अ‍ॅसिड वाढण्याची कारणं आणि उपाय सांगणार आहोत. 

कारणं

अनियमीत आणि चुकीच्या आहाराचे सेवन

मासाहार किंवा भात, पनीर, राजमा यांचे जास्त सेवन

जास्तवेळपर्यंत उपाशी राहणं

लठ्ठपणा

डायबिटीसच्या रुग्णांना ही समस्या जास्त उद्भवते. 

युरीक अ‍ॅसिड म्हणजेच सांधेदुखी हा त्रास आजकाल जवळपास सर्वांना होत असल्याचे दिसत आहे. साधारण पणे ३० वर्ष वयानंतर लोकांना हा आजार होतो. हे शरीरातील यूरिक अ‍ॅसिडमुळे  होते. जे ब्लड सर्क्युलेशनद्वारे किडनी पर्यंत पोहोचते आणि युरीन मार्गे बाहेर निघून जाते. युरीक अ‍ॅसिड वाढल्यानंतर  शरीरात गाठी सारखे जमा होण्यास सुरुवात होते आणि वेगाने शरीरातील इतर भागात पसरते.

उपाय

युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण नैसर्गिकरित्या सुद्धा कमी केलं जाऊ शकतं. त्यासाठी प्यूरिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश कमी करा. जेणेकरून पचनक्रिया व्यवस्थित राहील. 

युरिक अ‍ॅसिडचा त्रास असणाऱ्या लोकांनी दिवसा झोपू नये.

साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करू नये. कोल्ड्रिंक्स, सोडा, फ्रेश फ्रुट ज्यूसमध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असते.  रिफाइंड आणि पाकिटातील पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी आणि युरिक अ‍ॅसिड वाढण्याची शक्यता असते. 

जास्तीत जास्त पाणी प्यावे. जास्तीत जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील युरीक अ‍ॅसिड जलद गतीने बाहेर पडण्यास मदत होते. हवं तर तुम्ही आपल्या फोनमध्ये पाणी पिण्याचे रिमाडंर लावू शकता. शक्यतो गरम पाण्याचे सेवन टाळावे.

गुळवेलाच्या पानांची भाजी युरिक अ‍ॅसिडच्या त्रासाबरोबरच इतर अनेक उपद्रवात्मक त्रासही कमी करते. यासोबतच रक्त शुद्ध होते, वजनही कमी होते आणि प्रतिकारक्षमता वाढते. त्यासाठी गुळवेलाचे सेवन करावे. 

आहारात फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश करावा. चांगली झोप घेणं गरजेचं आहे. झोपेच्या २ ते ३ तास आधी स्क्रिनपासून लांब राहावे. रोज नियमीत व्यायाम करून तुम्ही या त्रासापासून आपली सुटका करू शकता. 
मासांहार, अंडी, राजमा, मशरूम या पदार्थांचे सेवन कमी करावे. 

(कोरोना विषाणूंचा धोका 'या' गोष्टीमुळे ८० टक्क्यांनी होईल कमी, तज्ज्ञांचा खुलासा)

(कोरोनाला रोखून रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या 'या' आयुर्वेदिक औषधाची सर्वत्र होत आहे चर्चा) 

Web Title: Uric acid causes treatment diet reduce uric acid level naturally myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.