लघवीसाठी इतक्या सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणं घातक, होऊ शकतात गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 12:27 PM2022-10-01T12:27:33+5:302022-10-01T12:28:14+5:30

Health : जास्तीत जास्त लोक हा विचारच करत नाही की, लघवी करण्यासाठी किती वेळ लागायला हवा?

Urination time longer than 20 seconds could signal health issues says expert | लघवीसाठी इतक्या सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणं घातक, होऊ शकतात गंभीर समस्या

लघवीसाठी इतक्या सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणं घातक, होऊ शकतात गंभीर समस्या

Next

(Image Credit : menshealth.com)

Health :  लघवीच्या माध्यमातून शरीरातील अनेक विषारी तत्व बाहेर पडतात. जर लघवी जास्त वेळ शरीरात राहिली तर त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. लघवीसंबंधी कोणत्याही बेजबाबदारपणामुळे आऱोग्याचं गंभीर नुकसान होऊ शकतं. मग ते लघवी थांबवून ठेवणं असो वा जास्त वेळ लघवी करणं असो. काही लोक असे असतात जे काही कारणाने तासंतास त्यांची लघवी रोखून ठेवतात. असं केल्याने शरीर ब्लॅडरमध्ये सूज येण्याचा धोका असतो. काही लोक लघवी करायला काही सेकंदच वेळ घेतात तर काही लोकांना लघवी करायचा जास्त वेळ लागतो. पण जास्तीत जास्त लोक हा विचारच करत नाही की, लघवी करण्यासाठी किती वेळ लागायला हवा?

एक्सपर्ट सांगतात की, जर कुणी लघवीसाठी जास्त वेळ लावत अशेल तर त्यांना आरोग्यासंबंधी समस्या होऊ शकतात. नुकतंच एका एक्सपर्टने सांगितलं की, किती सेकंदापेक्षा जास्त वेळ लघवी करणं आरोग्यासाठी चुकीचं ठरू शकतं. जर तुम्हीहीया निश्चित वेळापेक्षा जास्त वेळ लघवी करत असाल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डेलीस्टारच्या एका रिपोर्टनुसार, जॉर्जिया टेकच्या फिजिसिस्टने दावा केला आहे की, ज्या स्तनधारकांचं वजन 3 किलोपेक्षा जास्त असतं ते 21 सेकंदात त्यांचं ब्लॅडर रिकामं करू शकतात. अभ्यासकांनी दावा केला की, ब्लॅडर किती वेळात रिकामं होत आहे याकडे लक्ष देऊन आरोग्यासंबंधी समस्यांपासून वाचता येऊ शकतं.

यूनिवर्सिटी ऑफ मिशिगनच्या नर्स प्रक्टिशनर जोनिस मिलर यांच्यानुसार, जर तुमचा लघवी करण्याचा वेळ 20 सेकंदापेक्षा कमी असेल किंवा 20 सेकंदापेक्षा जास्त असेल तर याचा  अर्थ असा होतो की, तुम्ही लघवी रोखून ठेवली होती. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही 20 सेकंदापेक्षा जास्त वेळ लघवी करत असाल तर तुम्ही तुमची काळजी घेतली पाहिजे. तुम्हीच विचार करा की, तुम्ही जास्त पाणी पित आहात का किंवा तुम्ही लघवी रोखून ठेवत आहात का?

असं करून तुम्हाला तुमच्या सवयींबाबत माहिती मिळेल. जोनिस मिलर पुढे म्हणाल्या की, लघवी करण्यासाठी लागणारा जास्त वेळ हा आरोग्यासंबंधी समस्यांना संकेत देऊ शकतो. ज्यात  ब्लॅडर स्टोन, सिस्टिटिस आणि इतकंच नाही तर प्रोस्टेट संबंधी समस्याही होऊ शकतात.

Web Title: Urination time longer than 20 seconds could signal health issues says expert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.