लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचं आरोग्य चांगलं की धोकादायक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 03:47 PM2018-04-06T15:47:03+5:302018-04-06T15:47:03+5:30

लघवीच्या बदलत्या रंगावरुन आपल्या आरोग्याबाबत काही संकेत मिळतात. ते काय हे जाणून घेऊया.

Urine color will tell you about your health | लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचं आरोग्य चांगलं की धोकादायक?

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुमचं आरोग्य चांगलं की धोकादायक?

googlenewsNext

तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की, लघवीला गेल्यानंतर तुम्हाला लघवीचा रंग बदललेला दिसला असेल. असं का होत असावं याकडे तुम्ही फार गांभीर्याने लक्ष दिलं नसेल. पण असं होण्याला काही कारणं आहेत. लघवीच्या रंगावरुन आपण आपल्या आरोग्याबाबत जाणून घेऊ शकतो. लघवीच्या बदलत्या रंगावरुन आपल्या आरोग्याबाबत काही संकेत मिळतात. ते काय हे जाणून घेऊया.

1) जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा किंवा पाण्यासारखा असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. जर तुमच्या लघवीचा रंग पाण्यासारखा असेल तर याचा अर्थ तुमचं पोट आणि किडनी एकदम ठिक आहे. तुम्हाला कोणताही आजार नाहीये.

2) काही लोकांना पिवळ्या रंगाची लघवी येते. याचा अर्थ असा होतो की, तुमच्या पोटात पाण्याची कमतरता आहे. जर तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी पिण्यास सुरुवात केली तर पिवळा रंग हळूहळू आधीसारखा होतो.

3) जर तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी येत असेल, तर ही चिंतेची बाब असू शकते. कारण गडद पिवळ्या रंगाची लघवी तेव्हाच येते जेव्हा तुमच्या लिव्हरमध्ये काही समस्या असते. अशात जराही वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 4) जर तुमच्या लघवीचा रंग दुधी पांढरा येत असेल तर तुम्हाला किडनी स्टोन आहे हे समजा. किंवा तुमच्या शरीरात बॅक्टेरियाचं प्रमाण अधिक झाल्याचं समजा. अशावेळी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.

5) जर तुम्हाला हलक्या लाल रंगांची किंवा गुलाबी रंगाची लघवी येत असेल, तर याचं कारण म्हणजे तुम्ही स्ट्रॉबेरी सारखा एखादा पदार्थ खाल्ला असेल. असे नसेल तरीही तुम्हाला गुलाबी रंगाची लघवी येत असेल तर चिंतेची बाब आहे. यावरुन हे लक्षात येतं की, तुमच्या शरीरातील रक्त कोशिका खराब झाल्या आहेत. आणि त्यात रक्त मिसळलं जात आहे. हे त्वरीत डॉक्टरांना दाखवलं पाहिजे.

 6) कधी कधी डॉक्टर आपल्याला इतकं स्ट्रॉंग औषध देतात की, ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग नारंगी, पिवळा होतो. त्यासोबतच जे लोक गाजर खातात, त्याचा रस पितात त्यांच्याही लघवीता रंग नारंगी होतो. अशात घाबरण्याची गरज नाही.

Web Title: Urine color will tell you about your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य