लघवीच्या बदलत्या रंगाकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, वाचा काय सांगतो लघवीचा रंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 09:56 AM2024-10-21T09:56:58+5:302024-10-21T10:09:28+5:30

जर अचानक लघवीचा रंग डार्क होत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हा काही गंभीर आजारांचा संकेत असू शकतो.

Urine colour change dangerous effects, symptoms, risk | लघवीच्या बदलत्या रंगाकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, वाचा काय सांगतो लघवीचा रंग!

लघवीच्या बदलत्या रंगाकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात, वाचा काय सांगतो लघवीचा रंग!

Urine Colour sign : अनेकदा आपल्या शरीरात आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांमुळे वेगवेगळे संकेत बघायला मिळतात. मात्र, जास्तीत जास्त लोक या संकेतांकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना सामान्य समजतात. असाच एक गंभीर संकेत म्हणजे लघवीचा रंग बदलणे. सामान्यपणे हलक्या पिवळ्या रंगाची लघवी येण कॉमन आहे. पण जर अचानक लघवीचा रंग डार्क होत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण हा काही गंभीर आजारांचा संकेत असू शकतो. मायो क्लीनिकनुसार, जर लघवीचा रंग असामान्य दिसत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. 

लाल लघवी

जर तुमच्या लघवीचा रंग लाल झाला असेल तर ही गंभीर समस्या असू शकते. हा रंग किडनीमध्ये स्टोन झाल्याने आणि मूत्राशयामध्ये इन्फेक्शन झाल्याने होतो. जर लघवी करताना वेदना होत असेल आणि लघवीचा रंग लाल असेल तर हा चिंतेचा विषय ठरू शकतो. अशा स्थिती कॅन्सरचा धोकाही वाढतो.

डार्क आणि ऑरेंज

जर लघवीचा रंग जास्त गर्द किंवा नारंगी झाला असेल तर हा गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. खासकरून तेव्हा जेव्हा तुमच्या विष्ठेचा रंगही बदलतो. या स्थितीत लिव्हरची गंभीर समस्या असू शकते.

डॉक्टरांकडे कधी जावे?

जर यूरिनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन झालं किंवा किडनी स्टोन झाला तर लघवीचा रंग लाल दिसू लागतो. या स्थितीत लघवी करताना वेदना होते, पण जर वेदना होत नसेल आणि लघवीचा रंग लाल असेल तर ही धोक्याची घंटा आहे. कधी कधी यूरिनरी ट्रॅक्टमध्ये इन्फेक्शन झाल्याने लघवीचा रंग लाल होऊ शकतो. हा हायपर कॅल्सीमिया किंवा ब्लू डायपर सिंड्रोमचा संकेत असू शकतो. जर लघवीचा रंग डार्क किंवा ऑरेंज झाला असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

पारदर्शी लघवी आणि मद्यसेवन

यूरोलॉजी केअर फाउंडेशनमध्ये सांगण्यात आलं की, ड्यूरेटिक मेडिकेशनमुळेही पुन्हा पुन्हा लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो. सोबतच यात लघवीचा रंगही क्लीअर दिसू लागतो. नॅशनल असोसिएशन फॉर कॉन्टिनेन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, दारूचाही ड्येरिटिक इफेक्ट होतो. दारूचं सेवन केल्याने लघवी जास्त वेळ येते आणि पुन्हा पुन्हा लघवी केल्याने लघवीचा रंगही क्लिअर दिसू लागतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने जास्त लघवी करणे आणि दारूचं सेवन यातील संबंध सांगितला आहे.

वयस्कांसाठी जास्त लघवी करण्याचा अर्थ एका दिवसात 2.5 लीटर लघवी शरीरातून बाहेर निघणं. तुमच्या लघवीचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं. तुम्ही दिवसभर किती पाणी पिता यावर हे अवलंबून असतं. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण कमी किंवा जास्त असेल तर तुम्हाला फार जास्त लघवी पास करणे आणि क्लिअर लघवीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. दारू आणि कॅफीनचं एकत्र सेवन केलं तर लघवी जास्त वेळ येते. सोबतच यामुळे तुमच्या लघवीचा रंगही क्लिअर येतो.

Web Title: Urine colour change dangerous effects, symptoms, risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.