लघवीचा रंग बदलणं कधी असते धोक्याची घंटा? जाणून घ्या कसा रंग दिसल्यावर वाढू शकते चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2024 03:42 PM2024-09-03T15:42:45+5:302024-09-03T15:43:57+5:30

Urine Color : जर तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर असेल तर याचा अर्थ तुम्ही पाण्याचं सेवन फार जास्त प्रमाणात करत आहात आणि अशात तुम्ही पाण्याचं सेवन थोडं कमी करावं.

Urine colour change dangerous effects, symptoms risk disease | लघवीचा रंग बदलणं कधी असते धोक्याची घंटा? जाणून घ्या कसा रंग दिसल्यावर वाढू शकते चिंता!

लघवीचा रंग बदलणं कधी असते धोक्याची घंटा? जाणून घ्या कसा रंग दिसल्यावर वाढू शकते चिंता!

Clear Urine Color : लघवीच्या माध्यमातून आपल्या शरीरातील विषारी पदार्थ आणि जास्तीचं पाणी बाहेर पडत असतं. सामान्यपणे लघवीचा रंग हलका पिवळा असतो. पण जर हा रंग बदलला तर आरोग्य धोक्यात येऊ शकतं. शरीर हायड्रेट असेल तर लघवीचा रंग ट्रान्सपरन्ट आणि हलका पिवळा दिसतो. पण जर तुमच्या लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर असेल तर याचा अर्थ तुम्ही पाण्याचं सेवन फार जास्त प्रमाणात करत आहात आणि अशात तुम्ही पाण्याचं सेवन थोडं कमी करावं.

तुम्ही सकाळी उठून लघवी पास करत असाल तर लघवीचा रंग फार जास्त पिवळा दिसतो. याचा अर्थ हा आहे की, शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडले आहेत. पण सकाळच्या लघवीचा रंग जर पूर्णपणे क्लीअर दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पित आहात. हे बरोबर करण्यासाठी तुम्ही पाण्याचं सेवन थोडं कमी करावं.

त्याशिवाय इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे लघवीचा रंग पूर्णपणे क्लीअर दिसतो. डायबिटीस इंसिपिडस एक असामान्य आजार आहे ज्यामुळेही शरीरातील फ्यूइडचं प्रमाण अनियंत्रित होतं. यात व्यक्तीला फार जास्त तहान लागते आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते. 

क्लीअर लघवी आणि मद्यसेवन

यूरोलॉजी केअर फाउंडेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, ड्यूरेटिक मेडिकेशनमुळेही पुन्हा पुन्हा लघवीच्या समस्येचा सामना करावा लागतो. सोबतच यात लघवीचा रंगही क्लीअर दिसू लागतो. नॅशनल असोसिएशन फॉर कॉन्टिनेन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, दारूचाही ड्येरिटिक इफेक्ट होतो. दारूचं सेवन केल्याने लघवी जास्त वेळ येते आणि पुन्हा पुन्हा लघवी केल्याने लघवीचा रंगही क्लीअर दिसू लागतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने जास्त लघवी करणे आणि दारूचं सेवन यातील संबंध सांगितला आहे.

वयस्कांसाठी जास्त लघवी करण्याचा अर्थ एका दिवसात 2.5 लीटर लघवी शरीरातून बाहेर निघणं. तुमच्या लघवीचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं. कारण हे यावर अवलंबून असतं की, तुम्ही दिवसभर किती पाणी पिता. जर तुमच्या शरीरात कॅल्शिअमचं प्रमाण कमी किंवा जास्त असेल तर तुम्हाला फार जास्त लघवी पास करणे आणि क्लिअर लघवीच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. दारू आणि कॅफीनचं एकत्र सेवन केलं तर लघवी जास्त वेळ येते. सोबतच यामुळे तुमच्या लघवीचा रंगही क्लिअर येतो.

लघवीचा रंग काय सांगतो?

पेल यलो - मार्शफील्ड क्लिनीकनुसार, जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा आहे तर याचा हा अर्थ आहे की, तुम्ही चांगल्याप्रकारे हायड्रेट आहात.

डार्क यलो - जर तुमच्या लघवीचा रंग डार्क यलो असेल तर याचा अर्थ हा आहे की, तुम्हाला डिहायड्रेशनचा धोका फार जास्त आहे आणि तुम्ही जास्त प्रमाणात पाणी सेवन करण्याची गरज आहे.

ऑरेंज यूरिन : यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन डिआगो हेल्थनुसार, ऑरेंज यूरिनही तीन प्रकारची असते. लाइट ऑरेंज कलरची यूरिन हे दर्शवते की, तुम्हाला लवकरच डिहायड्रेशन होणार आहे. पण लिव्हरसंबंधी काही समस्यांमुळेही यूरिनचा रंग लाइट ऑरेंज येऊ शकतो. काही औषधांच्या सेवनामुळे तुमच्या लघवीचा रंग डार्क ऑरेंज होऊ शकतो. जार्क ऑरेंज यूरिन किंवा ब्राउन कलरची यूरिन गंभीर ड्रिहायड्रेशन आणि काविळची समस्या दर्शवते.

पिंक आणि रेड - काही पदार्थ जसे की, ब्लूबेरीज, रताळे इत्यादींचं सेवन केल्याने तुमच्या लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी दिसू शकतो. पण जर गुलाबी आणि लाल दिसण्यासोबतच यूरिनमधून रक्तही येत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं आहे. 

निळा आणि हिरवा - लघवीचा रंग निळा आणि हिरवा दिसत असेल तर हे काही खास औषधांमुळे होऊ शकतं. हा व्हजायनल म्यूकसचा संकेत असू शकतो. तशी तर लघवीमध्ये फेस दिसणं ही काही गंभीर समस्या नाही. पण जर असं नेहमीच होत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात प्रोटीनचं प्रमाण फार जास्त आहे.

Web Title: Urine colour change dangerous effects, symptoms risk disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.