यूरिन इन्फेक्शन ठरू शकतं घातक, बचावासाठी लगेच सुरू करा 'हे' घरगुती उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 10:42 AM2024-04-05T10:42:02+5:302024-04-05T10:42:39+5:30

Urine Infection Remedy: यूरिन इन्फेक्शन होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच जर याची लक्षणे माहीत असतील तर याचा धोका टाळू शकतो.

Urine Infection Remedy: What can you do for a urine infection at home | यूरिन इन्फेक्शन ठरू शकतं घातक, बचावासाठी लगेच सुरू करा 'हे' घरगुती उपाय!

यूरिन इन्फेक्शन ठरू शकतं घातक, बचावासाठी लगेच सुरू करा 'हे' घरगुती उपाय!

Urine Infection Remedy:  यूरिन इन्फेक्शन एक कॉमन आणि अनेकांना होणारी एक समस्या आहे. ही समस्या महिलांमध्ये जास्त होते. पण पुरूषांनाही होऊ शकते. यूरिन इन्फेक्शन यूरीनरी सिस्टीमच्या एखाद्या भागात होऊ शकतं. जसे की, किडनी, ब्लॅडर किंवा यूरेथ्रा या भागांमध्ये होऊ शकतं.

मायो क्लीनिकनुसार, यूरिन इन्फेक्शन होण्याची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच जर याची लक्षणे माहीत असतील तर याचा धोका टाळू शकतो. यूटीआयमध्ये अशी अनेक लक्षणे दिसतात जसे की, लघवी करताना जळजळ आणि वेदना जाणवणे, पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणे, ओटीपोटाच्या भागात वेदना, लघवी पास होण्यास वेळ लागणे इत्यादी.

यूरिन इन्फेक्शन झाल्यावर सामान्यपणे डॉक्टर अ‍ॅंटी-बायोटिक किंवा इतर औषधं घेण्याचा सल्ला देतात. यासोबतच तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. हे उपाय तुम्ही नियमित फॉलो केले तर तुम्हाला ही समस्याच होणार नाही.

पाण्याचे सेवन जास्त करा

इन्फेक्शन झालं असेल किंवा नसेल तरी रोज पाणी भरपूर पिणं फायदेशीर असतं भरपूर पाणी प्यायल्याने लघवीच्या माध्यमातून इन्फेक्शन शरीरातून बाहेर निघून जातं. याने यूरिन इन्फेक्शनच्या लक्षणांना कमी केलं जाऊ शकतं.

क्रेनबेरी ज्यूस

क्रेनबेरी ज्यूसमध्ये असलेल्या अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट तत्वांमुळे यूरिन इन्फेक्शनची समस्या कमी करण्यास मदत मिळते. तसेच यातील फ्लेवोनॉयड, अ‍ॅंटीऑक्सीडेंट, अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन-सी सोबतच फायबरसारखे तत्व असतात. जे इन्फेक्शन दूर करण्यास मदत करतात.

लसूण

जर तुम्हाला यूटीआयच्या समस्येपासून बचाव करायचा असेल तर आपल्या डाएटमध्ये लसणाचा समावेश करा. लसणांमध्ये असलेले अ‍ॅंटी मायक्रोबियल तत्व यूरिन इन्फेक्शन ठीक करण्यास मदत करतात.

हळद

हळदीमध्ये असलेले अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व यूरिन इन्फेक्शनची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं ज्यात अ‍ॅंटी-इन्फ्लामेटी, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-माइक्रोबियल तत्व असतात. 

Web Title: Urine Infection Remedy: What can you do for a urine infection at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.