Urine Problem Remedies: खोकताना, शिंकताना लघवीचे नियंत्रण सुटत असेल तर 'या' तीन गोष्टी आहारात सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:28 PM2022-07-16T19:28:03+5:302022-07-16T19:28:46+5:30

Urine Problem Remedies: आरोग्याशी निगडित ही समस्या केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही होते. त्यावर उपाय जाणून घेऊ. 

Urine Problem Remedies: If you lose control of urine while coughing, sneezing, start 'these' three things in your diet! | Urine Problem Remedies: खोकताना, शिंकताना लघवीचे नियंत्रण सुटत असेल तर 'या' तीन गोष्टी आहारात सुरू करा!

Urine Problem Remedies: खोकताना, शिंकताना लघवीचे नियंत्रण सुटत असेल तर 'या' तीन गोष्टी आहारात सुरू करा!

googlenewsNext

नैसर्गिक क्रिया अडवू नये. त्या वेळच्या वेळी कराव्यात असे आरोग्य शास्त्र सांगते. परंतु अनेकदा खोकताना, शिंकताना, उठ बस करतानादेखील काही जणांचे लघवीचे नियंत्रण सुटते. अशा वेळी अगदीच ओशाळल्यासारखे वाटते. ही समस्या केवळ महिलांनाच नाही तर पुरुषांनाही होते. ती कशामुळे होते आणि त्यावर उपाय काय, ते जाणून घेऊ. 

मूत्राशयाचे रचना अशी असते की ते लघवीने पूर्णतः भरले असता नैसर्गिक हाक येते. हे निरोगी मूत्राशयाचे लक्षण आहे. परंतु काही जणांना लघवीला जाऊन आल्यावर मूत्राशय रिकामे झाले असतानाही थोड्या फार शारीरिक हालचालींमुळे किंचित लघवी होते. हे आजारी मूत्राशयाचे लक्षण आहे. यावर उपाय म्हणजे आहारात काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा समावेश करणे. जसे की - 

खारीक : आपल्याकडे असे म्हणतात, खारीक खा आणि बारीक व्हा! हे अगदी खरे आहे. पोट सपाट करायचे असेल तर रोज चार खारकांचे सेवन केले पाहिजे. याच खारका मूत्राशयाचा विकार दूर करण्यासही मदत करतील. गुडघ्यातून येणारा खटकारा देखील खारकेने बरा होईल. यासाठी रोज सकाळी ब्रश केल्यावर चार खारका खात जा. 

मूग- मटकी : ही दोन कडधान्य जुळ्या भावंडांसारखी आपल्या स्वयंपाक घरात असतातच, पण त्याचा दैनंदिन वापर झाल्यास उत्तम गुण येतो. दररोज आलटून पालटून मूग मटकी भिजत घालावी आणि मोड आणून, शिजवून किंवा कच्ची खावीत. हे खाद्य शरीराला अनेक प्रकारचे फायदे देणारे आहे. मूग मटकीमुळे लघवीच्या त्रासावर नियंत्रण येते आणि मूत्राशय निरोगी होण्यास मदत मिळते. 

साजूक तूप : तुपाचे फायदे खूप! पण अलीकडे डाएट च्या नावावर गैरसमजुती एवढ्या पसरल्या आहेत की लोकांनी साजूक तुपाला हद्दपार करून बटर, चीज जवळ केले आहे. मात्र साजूक तुपाने वजन वाढत नाही उलट हजारो फायदे शरीराला मिळतात. मूत्राशयाच्या स्नायूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील तुपाचा उपयोग होतो. म्हणून ज्यांना हा त्रास आहे त्यांनी तुपाच्या बुदलीतल्या चमच्याने सकाळ, दुपार, संध्याकाळ तूप आपल्या आहारात समाविष्ट करायचे आहे. 

या सोप्या आहाराच्या टिप्स बरोबरच लघवीच्या जागेचे स्नायू आकुंचन-प्रसरण सराव केल्यास अधिक लाभ होतो. तसेच योगाभ्यास आणि विशेषतः ताडासनाची जोड फायदेशीर ठरते. 

Web Title: Urine Problem Remedies: If you lose control of urine while coughing, sneezing, start 'these' three things in your diet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.