दिवसातून 8 पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागतं? या समस्येकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:44 AM2022-06-27T10:44:52+5:302022-06-27T10:45:24+5:30
Prostate Cancer Symptoms : जसजसं पुरूषांचं वय वाढतं प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. प्रोस्टेट कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याचा धोका फार जास्त असतो.
कॅन्सर शरीराच्या बायोलॉजिकल प्रक्रियांना वाईट प्रकारे प्रभावित करतो. एक असा गंभीर आजार आहे ज्याचे सुरूवातीला काहीच लक्षण दिसत नाहीत. जसजसा हा आजार वाढतो, याची काही लक्षणं दिसू लागतात. लघवीला पुन्हा पुन्हा जावं लागणं हा कॅन्सरचा सुरूवातीचा संकेत असू शकतो. लंग कॅन्सरनंतर प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये आढळणारा सर्वात कॉमन कॅन्सर आहे. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका सर्वच पुरूषांना असतो. प्रोस्टेट कॅन्सरचं सर्वात कॉमन कारण वय असतं. जसजसं पुरूषांचं वय वाढतं प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. प्रोस्टेट कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याचा धोका फार जास्त असतो.
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं
प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणं वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळी दिसतात. तेच काही लोकांमध्ये याची काहीच लक्षणे दिसत नाहीत. जर काही लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.
- लघवी करताना त्रास होणे.
- पुन्हा पुन्हा लघवीला जावं लागणे खासकरून रात्री. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव अॅन्ड किडनी डिजीजनुसार, दिवसातून 8 किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लघवीला जावं लागत असेल तर हे प्रोस्टेट कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
- ब्लॅडर नेहमी भरलेलं वाटणं
- लघवी पास करताना वेदना आणि जळजळ होणे
- सीमन किंवा लघवीतून रक्त येणे
- पाठ, हिप्स आणि पेल्विक भागात वेदना
ही लक्षणं प्रोस्टेट कॅन्सरशिवाय दुसऱ्याही आजाराची लक्षणं असू शकतात.
प्रोस्टेट कॅन्सरपासून बचावाचे उपाय
- लो सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, फळं आणि भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करा. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार, प्रोस्टेट कॅन्सरच्या जास्तीत जास्त केसेस रोखल्या जाऊ शकत नाही. याचं कारण प्रोस्टेट कॅन्सरची कारण अजूनही समजू शकलेली नाहीत. अशात तज्ज्ञ फळं आणि भाज्यांसोबत हेल्दी डाएट घेण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांचं मत आहे की, जर तुम्ही प्रायव्हेट पार्टची व्यवस्थित स्वच्छता केली तर तुम्ही प्रोस्टेट कॅन्सरपासून वाचूही शकता.