थंडीच्या दिवसात पुन्हा पुन्हा लघवी येते का? हे 4 गंभीर रोग असू शकतात कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:49 AM2022-12-24T11:49:07+5:302022-12-24T11:49:26+5:30
Urine Disease: यूटीआयची स्थिती तेव्हा जास्त गंभीर होते जेव्हा हे इन्फेक्शन किडनीपर्यंत पसरतं. कंसल्टेंट-यूरोलॉजी डॉक्टर संजय गोगोई यांनी एका वेबसाइटला सांगितलं की, लघवीसंबंधी समस्यांची वेगवेगळी कारणे असू शकतात.
Urine Disease: लघवीसंबंधी अनेक समस्या होत असतात. ज्यातील एक नेहमीच होणारी समस्या म्हणजे यूटीआय (UTI) इन्फेक्शन. हे लघवीच्या मार्गात होतं. हे इन्फेक्शन सामान्यपणे फंगल, बॅक्टेरिया आणि वायरसमुळे होतं. याने किडनी, यूट्रस आणि ब्लॅडर प्रभावित होतं.
यूटीआयची स्थिती तेव्हा जास्त गंभीर होते जेव्हा हे इन्फेक्शन किडनीपर्यंत पसरतं. कंसल्टेंट-यूरोलॉजी डॉक्टर संजय गोगोई यांनी एका वेबसाइटला सांगितलं की, लघवीसंबंधी समस्यांची वेगवेगळी कारणे असू शकतात आणि यापासून कसा बचाव करावा याच्या काही टिप्स खाली दिल्या आहेत.
लघवीसंबंधी समस्येची लक्षण?
पुन्हा पुन्हा लघवी करण्याची इच्छा होणे
लघवीतून दुर्गंधी येणे
लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे
डार्क लघवी किंवा लघवीतून रक्त येणे
ताप किंवा थंडी वाजणे
थकवा
मळमळ
मांसपेशींमध्ये वेदना
महिलांमध्ये पेल्विक भागात वेदना
पाठीच्या खालच्या भागात दबाव
लघवीच्या समस्येचं कारण
लघवीसंबंधी समस्या सामान्यपणे तेव्हा होतात जेव्हा लघवीच्या मार्गात फंगल, बॅक्टेरिया किंवा व्हायरसने संक्रमित होतो. इतरही काही कारणे सांगता येतील.
- एक कमजोर इम्यून सिस्टीम
- पुरूषांमध्ये वाढलेलं एक प्रोस्टेट
- डायबिटीस
लघवीसंबंधी समस्या कशा रोखाल?
भरपूर पाणी प्यावे
पुन्हा पुन्हा लघवी करा
लघवी केल्यावर स्वच्छता
मूत्राशयात जळजळ निर्माण करणे पदार्थ टाळा
शारीरिक संबंधानंतर लघवी नक्की करा
जास्तीत जास्त लघवीसंबंधी समस्यांवर उपाय अॅंटीबायोटीक औषधांनी केला जातो. लवकर बरे होण्यासाठी औषधांचा कोर्स पूर्ण करा. त्याशिवाय हे महत्वाचं आहे की, तुम्ही भरपूर पाणी प्या आणि तरल पदार्थांच सेवन करा.