कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 04:33 PM2021-12-23T16:33:49+5:302021-12-23T16:37:08+5:30

प्रथमच, कोरोनाच्या सर्व प्रकारांवर परिणाम करणारी सिंगल डोस असणारी लस विकसित करण्यात आली आहे.

US Army develops single vaccine to fight against all Covid variants | कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

कोरोनात आनंदाची बातमी, फक्त सिंगल डोस असणारी लस विकसित, सर्व व्हेरिएंटवर प्रभावी

Next

डेल्टा व्हेरिएंटनंतर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संपूर्ण जगभराची चिंता वाढवली आहे. दरम्यान आता कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जगासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. जगात प्रथमच, कोरोनाच्या सर्व प्रकारांवर परिणाम करणारी सिंगल डोस असणारी लस विकसित करण्यात आली आहे.

डिफेन्स वनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील वॉल्टर रीड आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन कोरोना लस तयार केली आहे. ओमायक्रॉनसह कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर ही लस प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. असा दावा केला जातोय की, या लसीचा फक्त एक डोस प्रभावी आहे. रिपोर्टनुसार, येत्या काही आठवड्यांमध्ये औपचारिक घोषणा केली जाणार आहे.

डिफेन्स वनने त्यांना अहवालात म्हटलंय, 2 वर्षांपूर्वी SARS व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. पूर्वी आलेल्या लाटेत या व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या लसीवर काम करण्यात येत होतं.

यूएस आर्मीने 2020 च्या सुरुवातीला स्पाइक फेरीटिन नॅनो पार्टिकलवर आधारित ही लस तयार करण्यास सुरुवात केली. तज्ज्ञांनी ही लस अशा प्रकारे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवलं होतं की, ती केवळ कोरोनाच्या मूळ स्ट्रेनशीच नाही तर त्यानंतरच्या सर्व व्हेरिएंटला मात देईल. यूएस आर्मी लॅबने 2020 च्या सुरुवातीला कोरोना व्हायरचा पहिला डीएनए सिक्वेसिंग प्राप्त केला होता.

वॉल्टर रीड इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. केव्हॉन मोडजराड यांनी ही लस तयार केल्याचा दावा केला होता. ते म्हणाले की, या कोरोना लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा डिसेंबरच्या सुरुवातीलाच पूर्ण झाला होता. या लसीची Omicron आणि कोरोनाच्या इतर प्रकारांवरही चाचणी घेण्यात आली आहे

Web Title: US Army develops single vaccine to fight against all Covid variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.