वजन घटवणाऱ्यांसाठी ब्राऊन शुगरचा चहा आहे वरदान, वजन कमी वेळात होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 05:52 PM2021-07-29T17:52:23+5:302021-07-29T17:54:00+5:30
वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ब्राऊन शुगरचा समावेश केला जातो.दररोज सकाळी आपण ब्राऊन शुगरचा चहा घेण्याची सवय लावा. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल.
ब्राऊन शुगरमध्ये अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असते. पांढर्या साखरेच्या तुलनेत त्यावर रासायनिक प्रक्रिया कमी केलेल्या असतात. यात यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी सारखे घटक असतात. ब्राऊन शुगर ही रंगाने तपकिरी सते, जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्राऊन शुगरमध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यंत नगण्य असते. यामुळे वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात ब्राऊन शुगरचा समावेश केला जातो.दररोज सकाळी आपण ब्राऊन शुगरचा चहा घेण्याची सवय लावा. यामुळे तुमचे वजन लवकर कमी होईल.
ब्राऊन शुगर चहा रेसिपी:
हा चहा तयार करण्यासाठी दोन कप पाणी घ्या. त्यात दोन चमचे ब्राऊन शुगर आणि आले टाका. साधारण वीस मिनिटे गॅसवर चांगले उकळा. त्यानंतर गरमा गरम प्या. या चहामुळे तुमच्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच तुम्ही हा चहा दिवसातून कितीही वेळा घेऊ शकता.
पांढर्या साखरेच्या तुलनेत ब्राउन शुगर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. ब्राउन शुगर चयापचयाचा वेग वाढवते. यामुळे भूकही कमी लागते. मात्र, याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. ब्राऊन शुगर पाचन तंत्रासाठीही फायदेशीर आहे. ही पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करते.
पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आपण एक ग्लास कोमट पाण्यात ब्राऊन शुगर मिक्स करून प्या. ब्राऊन शुगरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. तसेच त्यात एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत. हे संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करते. म्हणून आपण ते अँटीसेप्टिक म्हणून वापरू शकता. दम्याचे रुग्ण पांढर्या साखरेऐवजी ब्राऊन शुगर वापरू शकतात. त्यामध्ये असणारे अँटीअॅलर्जी गुणधर्म दम्यावर मात करण्यास मदत करू शकतात.