केसातील कोंडाही होईल दूर आणि केस होतील मजबूत, लगेच करा हे सोपे घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 11:52 AM2024-06-08T11:52:07+5:302024-06-08T11:53:05+5:30
Hair Care : तुमच्या केसांमधील कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत होतील. दह्याचा वापर करून तुम्ही केसांमधील कोंडा दूर करू शकता. चला जाणून घेऊ यासाठी दह्याचा कसा वापर कराल.
Hair Care : केसांची जर योग्य काळजी घेतली नाही तर केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अनेकांना होते. केसांमध्ये कोंडा झाला तर डोक्याच्या त्वचेवर धूळ-माती जमा होते. त्यामुळे केसगळतीची समस्या होते. इतकंच नाही तर कोंडा झाल्याने केस खाजवतात सुद्धा. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही काही खास घरगुती उपाय करू शकता. यांनी तुमच्या केसांमधील कोंडाही दूर होईल आणि केसही मजबूत होतील. दह्याचा वापर करून तुम्ही केसांमधील कोंडा दूर करू शकता. चला जाणून घेऊ यासाठी दह्याचा कसा वापर कराल.
दह्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे केसांमधील कोंडा दूर करण्यास मदत करतात. याने डोक्याच्या त्वचेवर जमा झालेली धूळ आणि माती निघून जाते. दह्यामुळे डोक्याच्या त्वचेचं आरोग्यही चांगलं राहतं.
दही आणि लिंबाचा रस
तुम्ही केसांना केवळ दही लावू शकता किंवा त्यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. लिंबू आणि दही एकत्र करून लावले तर केसांना आवश्यक पोषण मिळतं. २ चमचे दह्यात १ चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण केसांवर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून दोनवेळा हा उपाय तुम्ही करा.
अंड आणि लिंबाचा रस
दह्यासोबतच केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी इतरही काही उपाय आहेत. एक अंड वाटीमध्ये फेटून घ्या. यात एक चमचा लिंबाचा रस टाका आणि हा हेअर मास्क केसांवर काही वेळासाठी लावून ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या.
बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
बेकिंग सोड्यात लिंबाचा रस टाकून केसांना लावल्याने डोक्यातील फंगस किंवा डोक्याच्या त्वचेवरील घाण, कोंडा दूर होतो. २ चमचे बेकिंग सोड्यात आणि ३ चमचे लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावून मालिश करा. याने कोंडाही दूर होतो आणि डोकं खाजवणंही बंद होतं.