डायबिटीस रूग्णांसाठी खजूर फायदेशीर ठरतं की नाही?; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 10:42 AM2019-10-08T10:42:25+5:302019-10-08T10:47:11+5:30

खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे घरातील लोक नेहमी बोलत असतात. पण त्याचे नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं.

Is the use of dates or khajur beneficial for diabetes patients | डायबिटीस रूग्णांसाठी खजूर फायदेशीर ठरतं की नाही?; जाणून घ्या सविस्तर

डायबिटीस रूग्णांसाठी खजूर फायदेशीर ठरतं की नाही?; जाणून घ्या सविस्तर

googlenewsNext

खजूर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचे घरातील लोक नेहमी बोलत असतात. पण त्याचे नेमके काय फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. ज्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यासोबतच याचे अनेक फायदेही आहेत. खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात. 

खजूर खाण्याचे फायदे माहीत असूनही डायबिटीस रूग्णांच्या मनात मात्र नेहमी हा प्रश्न असतो की, खजूर खाणं त्यांच्यासाठी फायदेशीर आहे की नाही? डायबिटीस रूग्णांना हाय-शुगर किंवा कॅलरी फूड्सपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. जेणेकरून त्यांच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण तेच खजूरमध्ये शुगर आणि कॅलरी मुबलक प्रमाणात असतात. अशातच प्रश्न पडतो की, डायबिटीस रूग्णांनी खजूराचं सेवन करावं की नाही? 

डायबिटीस रूग्णांसाठी खजूर खाणं फायदेशीर ठरतं की नाही? 

सेलेनियम, कॉपर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, फॉस्फरस आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असतं. पण डायबिटीस रूग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. तरिदेखील डायबिटीस रूग्ण 1 ते 2 खजूर खाऊ शकतात. परंतु, त्यासाठी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही साखर नसलेल्या दूधामध्ये खजून उकळून ते दूध पिऊ शकता. 

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतं... 

खजूरमध्ये ग्लूकोज आणि प्रुक्टोज मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतं. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते. 

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी... 

खजूर सुकल्यानंतर त्यातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर साखरेचे प्रमाणही वाढतं. दरम्यान, यामध्ये नॅचरल शुगर असते. परंतु, जर तुम्ही दररोज याचं सेवन करत असाल तर त्यासोबत एक्सरसाइज त्यासोबत एक्सरसाइज आणि इतर गोड पदार्थांचं सेवन करणं शक्यतो टाळा. 

जाणून घेऊया खजूर खाण्याचे इतर आरोग्यदायी फायदे... 

शूगर लेव्हलवर नियंत्रण

जर काही गोड खाण्याचं मन झालं तर कॅंडी खाण्याऐवजी दोन खजूर खावे. गोड खाण्याची तलब भागवण्यासाठी खजूर खाणे सर्वात हेल्दी पद्धत आहे. पण यात कॅलरीजही अधिक प्रमाणात असल्याने जास्त खाणे नुकसानकारक ठरु शकतं. 

पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत

खजूरात फायबरचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे खजूर खाल्ल्याने पचनक्रिया नियंत्रणात राहते. तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासही मदत होते. 

अशक्तपणा होतो दूर

शरीरात आयर्न कमी झाल्यास अशक्तपणा येऊ शकतो. खजुरामध्ये आयर्न मोठ्या प्रणामात असतं. त्यामुळे अशक्तपणा दूर होऊन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं. डब्ल्यूएचओच्या गाईडलाईननुसार, शरीराला पोटॅशिअम कमी मिळाल्याने ब्लड प्रेशर, हृदय विकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधीत आणखीही समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. 

हाडांना मिळते मजबूती

खजूर खाल्ल्याने कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन बी6 असतात. कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम दोन्हीमुळे हाडे मजबूज होतात.

सौंदर्य वाढविण्यासाठी 

खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहऱ्याला तेजी येते. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Is the use of dates or khajur beneficial for diabetes patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.