आंघोळीच्या पाण्यात टाका लिंबाचा रस, फायदे वाचून व्हाल आजच कराल सुरूवात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 05:09 PM2022-08-04T17:09:07+5:302022-08-04T17:09:29+5:30
Lemon Skin Care Tips: तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबू आपल्या शरीरावरील सगळी घाण दूर करतो आणि याने तुम्हाला त्वचेसंबंधी कोणतीही समस्या होत नाही. चला जाणून घेऊ याचे फायदे....
Lemon Skin Care Tips: लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. आपल्याला जेव्हाही पोटासंबंधी काही समस्या होते तेव्हा लिंबाच्या रसाचा वापर करून समस्या दूर केली जाते. लोकांना लिंबाचा रस पिऊन आराम मिळतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी आणि चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठीही लिंबाचा वापर केला जातो. तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबू आपल्या शरीरावरील सगळी घाण दूर करतो आणि याने तुम्हाला त्वचेसंबंधी कोणतीही समस्या होत नाही. चला जाणून घेऊ याचे फायदे....
त्वचेसाठी फायदेशीर
हा एक आयुर्वेदिक घरगुती उपाय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लोक हा उपाय वापरतात. जो शरीरासाठी फायदेशीर मानला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी चं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे याने त्वचेसंबंधी समस्या होत नाहीत. अशात केमिकलयुक्त साबणाऐवजी लिंबाच्या रसाच्या रसाचा वापर करू शकता.
सुरकुत्यासाठी रामबाण
आपलं शरीर एका गाडीप्रमाणे आहे. जसे आपण एखादी गाडी खरेदी करतो, तेव्हा ती सुरूवातीला चांगला मायलेज देते आणि वेळेनुसार तिच्याकडे लक्ष दिलं नाही तर ती खराब होते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेचं आहे. वाढत्या वयासोबत जेव्हा आपण आपल्या शरीराला चांगलं पौष्टिक जेवण देत नाही तर त्वचेसंबंधी समस्या निर्माण होऊ लागतात. या ठीक करण्यासाठी तुम्ही रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकू शकता.
शरीराची दुर्गंधी होते दूर
वाढत्या वयासोबत वाढत्या वजनाचा संकेत तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. जर कुणाच्या शरीरातून दुर्गंधी येऊ लागते तेव्हा समजून घ्या की, भविष्यात तुम्ही एखाद्या गंभीर आजाराचे शिकार होणार आहात. पण अनेकदा घामामुळेही शरीराची दुर्गंधी येऊ लागते. अशात तुम्ही आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर करावा.