'हे' पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम करत असाल तर जीवाला उद्भवू शकतो धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 10:03 AM2020-01-09T10:03:27+5:302020-01-09T10:04:05+5:30
सध्याच्या काळात मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करणं ही खूप साधारण गोष्ट झाली आहे.
सध्याच्या काळात मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करणं ही खूप साधारण गोष्ट झाली आहे. अनेकजण गॅसऐवजी मायक्रोवेवचा वापर करत असतात. पण हीच गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. साधारणपणे जेव्हा आपण मायक्रोवेवमध्ये जेवण गरम करत असतो तेव्हा त्यावर बॅक्टरिया राहण्याची शक्यता असते. ज्यामुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मायक्रोवेवचा वापर करायचा असेल तर त्यात कोणते पदार्थ गरम करायचे आणि कोणते पदार्थ गरम करायचे नाही हे माहीत असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे पदार्थ मायक्रोवेवमध्ये गरम केल्यानंतर तुमच्या आरोग्याला धोका उद्भवू शकतो.
अंड
जर तुम्ही उकळलेले अंड गरम करण्यासाठी मायक्रोवेवचा वापर करत असाल तर अंड फुटू शकतं. वाफेमुळे जास्त गरम होऊन ते खात असताना तुमचं तोंड सुद्धा भाजू शकतं. त्यासाठी तुम्ही उकळलेल्या अंड्याचे स्लाईल करून मग गरम करा नंतर त्याचे सेवन करा. असं केल्यास कोणताही धोका उद्भवणार नाही.
भात
फूड स्टँडर्ड एजंसीच्या अभ्यासानुसार मायक्रोवेवमध्ये जर तुम्ही भात गरम करत असाल तर फूड पॉईजन होण्याची शक्य़ता असते. भातात असणारे बॅसिलस सीरियस नावाचा बॅक्टरिया अधिक प्रमाणात असतो. पदार्थ गरम झाल्यामुळे त्यातील बॅक्टिरीया नष्ट होतात पण स्पोर्स निर्माण होत असतात. इंटरनैशनल जर्नल ऑफ फूड माइक्रोबायोलॉजी यात प्रकाशित झालेल्या शोधानुसार तापमान वाढल्यामुळे त्यात निर्माण होणारे स्पोर्स आपली संख्या वाढवतात. त्यामुळे फूड पॉईजन होण्याचा धोका असतो.
पालेभाज्या
जर तुम्ही पालक, मेथी यांसारख्या पालेभाज्या दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्यावेळी उरल्या असतील आणि तुम्ही ते मायक्रोवेवमध्ये गरम केले तर त्यात असणारे नाइट्रेट्स नाइट्रोसॅमाइंसमध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शक्य होत असल्यास मायक्रोवेवचा वापर कमी करा.
लाल- मिरची
जेव्हा तुम्ही लाल मिरची मायक्रोवेवमध्ये गरम करत असाल. ठेचा करण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी तर ते घातक ठरू शकतं. त्यातील कैप्साइसिन पदार्थाला चव देण्याचं काम करत असतात. त्याचा वास हवेत पसरल्यानंतर डोळ्यांमध्ये आणि गळ्यात जळजळ होण्याची शक्यता असते. तसंच ज्या लोकांना सर्दिचा त्रास होतो. त्या लोकांना शिंका येणं, डोळे लाल होणे अशा समस्या उद्भवू शुकतात