Weight loss tips: 'या' मसाल्याची पानं वापरा 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 02:21 PM2022-04-18T14:21:06+5:302022-04-18T14:50:36+5:30

आम्ही तुमच्यासाठी असे ३ उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा.

use mint leaves in this way to reduce or loose weight fast | Weight loss tips: 'या' मसाल्याची पानं वापरा 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट

Weight loss tips: 'या' मसाल्याची पानं वापरा 'अशाप्रकारे', की तुमचं वजन कमी होईल पटापट

googlenewsNext

लठ्ठपणा (Obesity) ही सध्या संपूर्ण जगातील मोठी समस्या बनली आहे. डब्ल्यूएचओच्या (WHO) मते, संपूर्ण जगात १.९ अब्ज लोक लठ्ठ आहेत. दरवर्षी ४० लाख लोकांचा लठ्ठपणामुळं अकाली मृत्यू होतो. लठ्ठपणा हे मधुमेह (Diabetes), रक्तदाब (high blood pressure), हृदयरोग (heart disease) यासारख्या घातक आजारांचे प्रमुख कारण आहे. वजन कमी करण्यासाठी पुदीनाही उपयुक्त ठरू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की पुदिन्याने तुम्ही वजन कसे कमी करू शकता? पण आम्ही तुमच्यासाठी असे ३ उपाय घेऊन आलो आहोत, ज्यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया पुदिना वजन कमी करण्यासाठी कसा (Mint for Weight Loss Method) वापरायचा.

मिंट आणि लिंबाचा रस
झीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार, पुदिन्याचे पाणी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. परंतु, ते पिण्याची योग्य पद्धत समजून घेणं आवश्यक आहे. तुम्ही पुदिना आणि लिंबू यांचे मिश्रण बनवू शकता. पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

या गोष्टी पुदिन्यात मिसळा
शरीरातील नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो. पुदिन्याचे पाणी प्यायल्याने आपले शरीर चांगले डिटॉक्स होईल. यासाठी अर्धे सफरचंद, डाळिंबाचे दाणे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस एका ग्लास पाण्यात टाकू प्या. वजन कमी करण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल.

पुदिना आणि कोथिंबीर
याशिवाय पुदिन्यासोबत कोथिंबीरही मिक्स करू शकता. पुदिन्यासोबतच कोथिंबीरही वजन कमी करण्यास मदत करते. दोन्ही पानांचा एकत्र वापर केल्यास वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

पुदिन्याच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला मिळतील -

  • पुदिना औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.
  • वजन कमी करण्यासोबतच यामुळे अनेक आजार आपल्याला होणार नाहीत.
  • अपचन होत असेल तर तुम्ही पुदिन्याचा वापर करू शकता
  • निरोगी त्वचेसाठीही तुम्ही पुदिन्याचे पाणीही पिऊ शकता.

Web Title: use mint leaves in this way to reduce or loose weight fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.