किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'या' फळाच्या रसाचा करा असा वापर, आहे खुपच फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 05:50 PM2022-04-24T17:50:25+5:302022-04-24T17:57:19+5:30

किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रोज एक पेय पिऊन तुम्ही तुमचा हा महत्त्वाचा अवयव स्वच्छ करू शकता आणि किडनीला होणारे नुकसान टाळू शकता. जाणून घेऊया किडनी क्लींजिंग ड्रिंक कधी आणि कसे (Lemon Drinks for Kidney) प्यावे.

use of different types of lemon water for kidney | किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'या' फळाच्या रसाचा करा असा वापर, आहे खुपच फायदेशीर

किडनीचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी 'या' फळाच्या रसाचा करा असा वापर, आहे खुपच फायदेशीर

googlenewsNext

आपल्या शरीरात किडनीचं कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. मूत्रपिंडाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्त स्वच्छ करणं आणि त्यातील नको असलेले विषारी घटक दूर करणं. शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत करते. रेनिन नावाच्या संप्रेरकाद्वारे किडनी रक्तदाब कमी किंवा वाढवू शकते. किडनी निरोगी ठेवण्यासाठी आपण काळजी घ्यायला हवी. रोज एक पेय पिऊन तुम्ही तुमचा हा महत्त्वाचा अवयव स्वच्छ करू शकता आणि किडनीला होणारे नुकसान टाळू शकता. जाणून घेऊया किडनी क्लींजिंग ड्रिंक कधी आणि कसे (Lemon Drinks for Kidney) प्यावे.

शरीरात किडनीचे महत्त्व काय?
झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मूत्रपिंड शरीरातील घाण आणि शरीरातील द्रवपदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते. याशिवाय किडनी मानवी शरीरातील मीठ, पोटॅशियम आणि ऍसिडचे प्रमाण नियंत्रित करते. यासोबतच काही हार्मोन्स देखील किडनीमधून बाहेर पडतात जे आपल्या शरीराच्या इतर अवयवांना कार्य करण्यासाठी आवश्यक असतात.

लिंबू किडनीसाठी फायदेशीर आहे -
हार्वर्डच्या अहवालानुसार, दररोज 2 लिंबांचा रस प्यायल्याने मूत्रमार्गात सायट्रेट वाढते आणि किडनीतील विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्याच वेळी, जे लोक दररोज २ ते २.५ लिटर लघवी करतात, त्यांना किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी असते. किडनीला हेल्दी ठेवणाऱ्या ड्रिंक तुम्ही सकाळी आणि दुपारी पिऊ शकता.

मूत्रपिंडांसाठी लिंबू पेय

  1. पुदीना आणि लिंबू
    एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि थोडी साखर घालून चांगले मिसळा आणि प्या. किडनीसाठी हे हेल्दी ड्रिंक आहे.
  2. मसाला लिंबू सोडा
    एक ग्लासमध्ये लिंबाचा रस, जिरे-धणे पूड, चाट मसाला आणि सोडा चांगला मिसळा. मसाला लिंबू सोडा तयार होईल, जो आपल्या किडनीसाठी हेल्दी ड्रिंक आहे.
  3. नारळ शिकंजी
    हेल्दी किडनी ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लासमध्ये नारळ पाणी घ्या आणि या पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. नारळ पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या पद्धतीनं घेतल्यास त्याचा किडनीसाठी फायदा होतो.

Web Title: use of different types of lemon water for kidney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.