मोबाइल, लॅपटॉप अधिक वापराल, तर विकारांना निमंत्रण द्याल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:39 AM2024-01-15T10:39:29+5:302024-01-15T10:40:11+5:30

मानेचे आजार, पाठदुखी वाढली, काळजी घ्या, तज्ज्ञांचे आवाहन.

Use of mobile laptop more you will invite disorders know about health tips | मोबाइल, लॅपटॉप अधिक वापराल, तर विकारांना निमंत्रण द्याल...

मोबाइल, लॅपटॉप अधिक वापराल, तर विकारांना निमंत्रण द्याल...

Health Tips : सामाजिक माध्यमांवर विविध विषयांवर पोस्ट लिहायची, मोबाइलवर तासन्तास चॅटिंग करायची, मेसेज करायचे म्हटले तर मोबाइल, लॅपटाॅपचा वापर करावाच लागतो. हल्ली मोबाइल, लॅपटाॅपचा वापर वाढला आहे आणि त्यातूनच पाठ, बोटांची दुखणी वाढली आहेत. कोरोना प्रादुर्भावानंतर मोबाइल, संगणकाचा वापर वाढला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोबाइलचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आजकाल बरेचसे लोक लॅपटॉप किंवा मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवतात. ऑफिस व्यतिरिक्तही लॅपटॉप आणि मोबाइलवर फिल्म, रील्स, सोशल मीडियाचा वापर करत असतात. मोठी माणसे असोत की लहान मुले सगळ्यांचाच फोनचा वापर वाढला आहे; मात्र या सर्वांमुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येऊन ते थकतात. एवढेच नव्हे तर काही वेळेस डोळे कोरडे होणे, खाज सुटणे किंवा डोळे जळजळणे असा त्रासही होत असतो. या सर्वांपासून सुटका हवी असेल तर डोळ्यांची नीट आणि खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

स्वतःला पुरेसा वेळ द्यावा. मोबाइल, लॅपटाॅपमुळे हाताचा, बोटांचा वापर वाढला आहे. त्यातून बोटांच्या जाॅइंट्सवर फारसा परिणाम होत नाही; मात्र रुग्णांच्या बोटांना त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे बोटांनाही पुरेसा आराम दिला पाहिजे. मोबाइलचा अतिवापर टाळावा - डाॅ. समीर मोहिते, अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ

अंगठ्याचा व्यायाम कसा कराल? 

  प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तो स्वत:च्या प्रकृतीनुसार योग्य आहे का, हे तज्ज्ञांकडून जाणून घेतले पाहिजे.
 
  तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा. अंगठ्यासह हाताच्या बोटाची हालचाल होईल, असे विविध व्यायाम करता येतात.

काय काळजी घ्याल?

 मोबाइल, लॅपटाॅपचा अतिवापर टाळावा. मोबाइलवरून सतत लांब मेसेज करण्यातून अंगठ्याचे दुखणे वाढते. 

 संगणकाच्या की-बोर्डद्वारे मजकूर टाइप करण्यावर भर द्यावा.

स्क्रीन लाइटची घ्या विशेष काळजी :-

फोन आणि लॅपटॉपच्या स्क्रीनचे लाईटिंग योग्य ठेवा, यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळेल. अनेक वेळा लोक कमी किंवा अपुऱ्या प्रकाशात काम करतात, पण त्यामुळे आपल्याच डोळ्यांवर जास्त ताण येतो. 

जर तुम्ही कमी प्रकाशात सतत काम करत असाल, तर त्यामुळे डोळ्यांवर खूप ताण येऊ शकतो. त्यामुळे मॉनिटरचा प्रकाश योग्य ठेवा. त्यामुळे डोळ्यांवर कमी दाब पडतो.

टेस्टिंग थंब म्हणजे काय?

टेस्टिंग थंबला ट्रिगर थंब असेही संबोधले जाते. यात रुग्णांना वेदना होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये बोट वाकणे किंवा लांब करताना वेदना होतात. मोबाइलवरून सतत मजकूर पाठवण्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो.

Web Title: Use of mobile laptop more you will invite disorders know about health tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.