एकच मास्क धुवून वापरणं ठरू शकतं जीवघेणं; स्वस्त मास्क विकत घेताना नक्की पाहा 'या' गोष्टी 

By manali.bagul | Published: December 30, 2020 11:43 AM2020-12-30T11:43:43+5:302020-12-30T11:45:25+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कापडापासून तयार केलेले रेयुजेबल मास्क खिशाला परवणारा असतो. तसंच पर्यावरणासाठीसुद्धा अनूकुल असतो.

Use of same face mask more than once can be dangerous than not using one | एकच मास्क धुवून वापरणं ठरू शकतं जीवघेणं; स्वस्त मास्क विकत घेताना नक्की पाहा 'या' गोष्टी 

एकच मास्क धुवून वापरणं ठरू शकतं जीवघेणं; स्वस्त मास्क विकत घेताना नक्की पाहा 'या' गोष्टी 

Next

कोरोनाच्या माहामारी दरम्यान स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. चांगल्या दर्जाचा मास्क ७० टक्क्यांपर्यंत संक्रमणापासून सुरक्षा प्रधान करू शकतो. याशिवाय संबंधित इतर आजार पसरवण्याचा  धोकासुद्धा कमी होतो. सर्जिकल मास्क खूप परिणामकारक ठरतात. सध्या अनेक लोक रियुजेबल मास्कचा वापर करत आहेत. कापडापासून तयार केलेले रेयुजेबल मास्क खिशाला परवणारा असतो. तसंच पर्यावरणासाठीसुद्धा अनूकुल असतो.

रियुजेबल मास्क कधीपर्यंत संरक्षण देऊ शकतो?

एका नवीन अभ्यासानुसार माहामारीच्या काळात एकाच मास्कचा सतत वापर करणं जोखमीचं ठरू शकतं. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जिकल मास्कचा पुन्हा पुन्हा वापर करणं माहामारीपासून बचाव न होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. सर्जिकल मास्कचे फॅब्रिक्स सतत वापर करण्यासाठी योग्य नसते. हा मास्क तयार करण्यासाठी एब्जॉर्बल लेअर तयार केला जातो. त्यामुळे एकदा वापरल्यानंतर  पुन्हा तोच मास्क वापरल्यास सुरक्षा प्रधान करू शकत नाही. 

वैज्ञानिकांनी आपल्या अध्ययनात एका कंम्प्यूटर मॉडेलचा उपयोग करून सर्जिकल मास्कचा वापर करून कोरोनापासून कितपत संरक्षण मिळवता येतं हे पाहिले होते. मास्कच्या फॅब्रिक्समुळे नाकाच्या छिद्रांमध्ये हवेचा प्रवेश होण्याच्या क्रियेत बदल होतो. मास्कचा प्रकार, संक्रमणाची जोखिम ही मास्कच्या प्रकारावर अवलंबून असते.

नवीन आणि फ्रेश मास्क सगळ्यात जास्त सुरक्षा प्रदान करतो. तर इतर मास्क केवळ ६० टक्के अशुद्धतेला फिल्टर करतात. पुन्हा वापरण्यायोग्य किंवा सर्जिकल मास्क निवडण्यापूर्वी तयार केलेल्या फॅब्रिकची तपासणी केली पाहिजे. दीर्घकालीन वापरादरम्यान त्याचे फॅब्रिक वारंवार धुतल्यानं गुणवत्ता कमी  होते. वारंवार वापरल्या जाणार्‍या स्वस्त गुणवत्तेच्या मास्कचा नैसर्गिकरित्या प्रभाव कमी होतो.

मास्क विकत घेताना या  गोष्टी लक्षात घ्या

आपण ट्रेंडी आणि फॅशनेबल मास्क वापरणार असाल तर त्याचे फॅब्रिक खरेदी करुन पहा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा मास्कमधील थ्रेडवर्क सेक्विनमुळे (सजावटीसाठी कपड्यांवर तयार केलेल्या वस्तू) फॅशनेबल वाटू लागले असले तरी, वापरल्या जाणार्‍या कमी-गुणवत्तेच्या फॅब्रिकमुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

Coronavirus: भारतात कोरोनाचा आणखी एक गंभीर साइड इफेक्ट आला समोर, डॉक्टरांनी दिला इशारा....

चांगल्या प्रतीचा मास्क असा असावा जो चेहरा झाकून ठेवू शकेल, पूर्णपणे सुरक्षित असेल. डिस्पोजेबल मास्क कधीही वापरु नये, पुन्हा वापरण्यायोग्य मास्कची गुणवत्ता कधीही कमी होऊ शकते. मास्क किती वेळा धुतले गेले, किती वेळा ते वापरले गेले हे महत्वाचं असतं. प्रवास करताना नेहमीच मास्क बदलत राहणं आवश्यक आहे. 

घाबरायची गरज नाही!; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही लस प्रभावी, आरोग्य मंत्रालयाचा मोठा दावा

मास्क वापरताना नाक, तोंड व्यवस्थित झाकलं जाईल असा मास्क निवडा.  मास्कचे इलास्टिक तपासून पाहा. जास्त घटट् किंवा सतत लूज होईल असा मास्क वापरू नका. मास्क फाटलेला असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची सुचना असू शकते, असा मास्क लगेचच फेकून द्या. 
 

Web Title: Use of same face mask more than once can be dangerous than not using one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.