मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 06:30 PM2017-01-13T18:30:06+5:302017-01-13T18:30:06+5:30

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधन आपल्या पूर्वजांनी या अगोदरच केले आहे. मात्र एका नवीन संशोधनानुसार हळदीमध्ये मेंदूची स्वत:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे सिद्ध झाले आहे.

Use of turmeric to increase brain capacity! | मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !

मेंदूची क्षमता वाढण्यासाठी हळद उपयुक्त !

Next
दीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे संशोधन आपल्या पूर्वजांनी या अगोदरच केले आहे. मात्र एका नवीन संशोधनानुसार हळदीमध्ये मेंदूची स्वत:हून बरे होण्याची क्षमता वाढविण्याचा गुण असल्याचे सिद्ध झाले आहे.

संशोधकांनी हळदीमध्ये आढळणाऱ्या ‘टॅमरिन’ या घटकाचा अभ्यास केला. इंजेक्शनच्या माध्यमातून हा घटक उंदरांच्या शरीरात सोडण्यात आला. उंदरांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यांच्या मेंदूतील पेशींच्या विकासासाठी आवश्यक असलेला भाग अधिक सक्रिय झालेला दिसला. हा निष्कर्ष जर्मनीतील इन्स्टिट्यूट आॅफ न्यूरोसायन्स अँड मेडिसीनमधील ‘स्टेम सेल रिसर्च अँड थेरपी’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

उंदरांच्या मज्जातंतूंच्या स्टेम सेल्सना टॅमरिनच्या द्रावणात बुडविल्यावर या पेशींमध्ये मेंदूतील कुठल्याही प्रकारच्या पेशी बदलण्याची क्षमता आल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. हळदीवरच्या या गुणकारी संशोधनामुळे अल्झायमर आणि मेंदूच्या इतर विकारांवर औषध बनविण्यात मदत होऊ शकते, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

उंदरांवर केलेल्या संशोधनातून हे निष्कर्ष काढले असून, मनुष्याच्या मेंदूवर हळदीच्या होणाऱ्या परिणामाबाबत अधिक संशोधनाची गरजही संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधक मारिया एडेल रुजर म्हणाले, ‘मानवासह इतर विकसित प्राण्यांमध्ये मेंदूतील बिघाड दुरुस्त करण्याची क्षमता नसते, मात्र मासे व इतर छोट्या प्राण्यांमध्ये ही क्षमता तुलनेने अधिक असते. या संशोधनामुळे मानवामध्येही ही क्षमता विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे.’

Web Title: Use of turmeric to increase brain capacity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.