उन्हाळ्यात कोथिंबीर उपयोगी भारी : झटपट सारे रोग दूर करी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:17 PM2019-03-18T20:17:07+5:302019-03-18T20:20:25+5:30
तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे.
पुणे : तापलेले ऊन आणि त्यामुळे अंगाची होत असलेली लाही लाही दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी सर्वांत उपयोगी घटक म्हणजे कोथिंबीर. घरच्या घरी ताबडतोब आणि स्वस्तात होणारा उपाय म्ह्णून उन्हाळ्यात असणारे कोथिंबीरीचे महत्व घेणे गरजेचे आहे. चला तर बघूया कोथिंबीरीचे फायदे आणि उपयोग :
त्वचेची आग थांबवते :
उन्हात फिरून आल्यावर अंगाची आग होत असेल किंवा जळजळ वाटत असेल तर कोथिंबिरीचा रसत्या जागेवर लावा. तेवढे शक्य नसेल तर कोथिंबिरीच्या काड्या आणि पानं हाताने चुरून हलक्या हाताने दाह होणाऱ्या जागी लावा. काही वेळात थंडावा जाणवायला सुरुवात होईल.
मळमळ थांबवते :
पाणी कमी झाल्याने किंवा ऊन लागल्याने अनेकदा उन्हाळ्यात मळमळ होते. उलटीची भावना होते मात्र उलटी होत नसल्याने अस्वस्थ वाटते अशावेळी मळमळ थांबवण्यासाठी कोथिंबिरीची आठ ते दहा पानं चावून खाल्याने बरं वाटते. त्यानंतर त्यावर पाव चमचा साखर खाल्ल्याने तात्काळ फरक पडेल.
मुरुमंही होतात दूर :
उन्हाळ्यात त्वचेवर येणाऱ्या घामामुळे आणि तेलामुळे धूळ बसून मुरुमाचे आणि फोडाचे प्रमाण वाढते. अशावेळी दोन चमचे कोथिंबीर रसात चिमूटभर हळद लावून तो पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा. वाळल्यावर हलक्या हाताने चोळून चेहरा थंड पाण्याने धुवावा.
पोटदुखीपासून आराम :
पोटदुखीमुळे होणाऱ्या वेदनाही कोथींबिरीमुळे दूर होतात. गॅस, अपचन झाले असल्यास आंबट नासलेल्या ताज्या टाकत कोथिंबिरीचा रस,हिंग आणि काळे मीठ टाकून घेतल्यास फरक पडतो.
डोळ्यांचे आरोग्य सुधारते :
डोळ्यांच्या आरोग्यासाठी लागणारे व्हिटॅमिन ए कोशिंबिरीत मोठ्या प्रमाणात असल्याने नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
अशी साठवा कोथिंबीर :
एका हवाबंद स्टीलबंद डब्यात कोथिंबीर निवडून आणि मुख्य म्हणजे पूर्ण कोरडी करून ठेवा. अशी कोथिंबीर फ्रीजमध्ये १० ते १२ दिवस सुस्थितीत राहते.