खुशखबर! T3X मलम नाकात लावल्यानं काही सेकंदात कोरोना नष्ट होणार; तज्ज्ञांचा  दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 04:09 PM2020-08-24T16:09:05+5:302020-08-24T17:39:18+5:30

संक्रमित रुग्णांना वाचवण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी ठरणारं औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावं या दृष्टीने तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत.

Usfda approved t3x ointment has been proven to prevent treat and kill viral infections in 30 seconds | खुशखबर! T3X मलम नाकात लावल्यानं काही सेकंदात कोरोना नष्ट होणार; तज्ज्ञांचा  दावा

खुशखबर! T3X मलम नाकात लावल्यानं काही सेकंदात कोरोना नष्ट होणार; तज्ज्ञांचा  दावा

Next

कोरोना व्हायरसपासून सुटका मिळवण्यासाठी जगभरात विविध कंपन्या औषध तयार करत आहेत. लसीच्या चाचण्याही सुरू आहेत.  याव्यतिरिक्त अनेक औषधांवर रिसर्च सुरु आहे.  संक्रमित रुग्णांना वाचवण्यासाठी परिणामकारक आणि प्रभावी ठरणारं औषध लवकरात लवकर उपलब्ध व्हावं या दृष्टीने तज्ज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अशा स्थितीत अमेरिकेच्या कंपनीकडून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एका फार्मा कंपनीनं एक मलम तयार करण्याचा दावा केला आहे. हे मलम नाकात गेल्यानंतर ३० सेकंदाच्या आत  कोरोनाचा प्रभाव कमी होतो. या ट्रीटमेंटला T3X असं नाव दिलं आहे.

प्रतीकात्मक तस्वीर

कोरोनाला नष्ट करणारं हे मलमं कसं प्रभावी ठरतं?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार नाकात हे मलम लावल्यानं कोरोनासोबतच अनेक प्रकारच्या व्हायरसच्या संक्रमणाला रोखलं जाऊ शकतं. हे मलम नाकाला लावल्यानंतर नाकात एक थर तयार होईल. त्यामुळे  कोरोना व्हायरसला नाकातून शरीरात जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं. साधारणपणे जगभरात कोरोना व्हायरस नाकाद्वारे पसरल्याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत.

अशा स्थितीत मलम वापरल्याने नाकाद्वारे होणारा  कोरोना संसर्ग रोखला जाऊ शकतो. टेक्सासमधील कंपनी पेनिट्रेशन टेक्नोलॉजीचे प्रमुख डॉ. ब्रायन  हबर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मलमचा वापर परिणामकारक ठरेल. हे मलम कोरोनाशी लढण्यासाठी सुरक्षाचक्र ठरेल. अमेरिकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशनने T3x ओवर-द-काउंटर हे मलम घेण्यासाठी परवानगी दिली आहे. म्हणजेच हे मलम घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता भासणार नाही. मेडिकलमध्ये हे मलम उपलब्ध होऊ शकतं.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या मलमाच्या चाचण्या दोन महिन्यांपासून सुरू होत्या. त्यानंतर अमेरिकी फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन कडून वापरासाठी परवागनी मिळाली आहे. चाचणीदरम्यान या मलमच्या वापरामुळे कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 

(टिप- जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  कोरोनापासून बचावासाठी हे मलम प्रभावी ठरत असल्याचा दावा अमेरिकन कंपनीच्या तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे.)

हे पण वाचा-

चिंताजनक! कोरोना लसीसाठी 'असा' शॉर्टकट वापरल्यास संपूर्ण जगाचा जीव धोक्यात येणार

Coronavirus: कोरोना लस ७३ दिवसांत आणि मोफत शक्य नाही; सिरम इन्स्टिट्यूटचं स्पष्टीकरण

Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

Web Title: Usfda approved t3x ointment has been proven to prevent treat and kill viral infections in 30 seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.