...म्हणून 'ही' 6 कामे करताना स्मार्टफोनचा वापर टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:22 PM2018-07-11T15:22:49+5:302018-07-11T15:26:01+5:30
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. सध्या स्मार्टफोन्समुळे संपूर्ण जग आपल्या हातात आले आहे, असे म्हटले जाते. स्मार्टफोन्समुळे अनेक फायदे होत असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत.
सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. सध्या स्मार्टफोन्समुळे संपूर्ण जग आपल्या हातात आले आहे, असे म्हटले जाते. स्मार्टफोन्समुळे अनेक फायदे होत असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. जगभरामध्ये हजोरो, लाखो नाहीतर कोट्यावधी लोक दिवसभरात १५० पेक्षा जास्तवेळा आपला मोबाईल फोनचा वापर करतात. कारण कोणतेही असो परंतु ही सवय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरू शकते. एका संशोधनातून असे समोर आले आहे की, दिवसभरात काही असा वेळ असतो ज्यावेळी आपण मोबाईलचा वापर करणे टाळणे गरजेचे आहे. जाणून घेऊयात अशा कोणत्या वेळा आहेत.
सकाळी उठल्या उठल्या -
यू. के. मध्ये झालेल्या संशोधनानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईलचा वापर केल्यामुळे तणाव आणि चिंता वाढते. ही सवय तुम्हाला आनंदापासून दूर ठेवण्याचे काम करते.
काम करण्याआधी -
एक्सपर्टचे असे मत आहे की, कोणतेही महत्त्वाचे काम किंवा मिटींगच्या आधी मोबाईलचा वापर केल्याने तुमची कार्य क्षमता कमी होऊ शकते. संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, मोबाईलच्या जास्त वापरामुळे तुमचा ताण वाढू शकतो आणि काम करण्याआधी एखाद्या गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे तुमच्या कामावर वाईट परिणाम होऊ शकतो.
काम करत असताना -
करिअर कोच स्टीव्ह वॅग यांच्यानुसार, कोणतेही काम करताना जास्तीत जास्त लोक आपल्या कामामध्ये पूर्णपणे रमून जातात. अशातच मोबाईलची रिंग किंवा मॅसेज टोनमुळे होणाऱ्या डिर्स्टर्बन्समुळे पुन्हा कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते. याच सरळ परिणाम तुमच्या कामावर होतो.
वाचत असताना -
काही चांगल्या गोष्टी वाचल्याने आपलं डोकं शांत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर आपली स्मरणशक्ती चांगली राहण्यासही मदत होते. पण जेव्हा तुम्ही काही वाचताना मोबाईलचा वापर करता. तेव्हा तुमचे लक्ष विचलित होते.
झोपण्याआधी मोबाईलचा वापर केला तर -
झोप न येण्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल. मोबाईलच्या स्क्रिनमधून येणाऱ्या लाईटमुळे स्लीप हार्मोन मेलाटोनिन डिस्टर्ब होतात. या हार्मोन्सच्या डिस्टर्ब होण्यामुळेच अनिद्रेचा त्रास होतो. यासाठी झोपण्यापूर्वी ३० मिनिटे आधीपर्यंत मोबाईलचा वापर करणे टाळावे.
झोपेत असताना -
अनेक लोक झोप मोड झाल्यानंतर लगेच मोबाईल वापरण्यास सुरुवात करतात. ही सर्वात वाईट सवय आहे. असे केल्यामुळे पुन्हा झोप येतच नाही. परिणामी अपूर्ण झोपेमुळे दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढा मोबाईलचा वापर कमी करावा. महत्त्वाचे म्हणजे झोपण्यापूर्वी मोबाईलपासून शक्य तेवढे दूर रहावे.