काय आहे 'व्हजायनल स्टीमिंग'?; फिमेल व्हजायनासाठी फायदेशीर ठरतं की घातक?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 11:49 AM2019-08-13T11:49:54+5:302019-08-13T11:57:09+5:30
सध्या महिलांमध्ये एका विचित्र गोष्टीचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे, त्याचं नाव आहे व्हजायनल स्टीमिंग (Vaginal Steaming). सध्या महिलांमध्ये ही गोष्ट प्रचंड पॉप्युलर होत आहे.
सध्या महिलांमध्ये एका विचित्र गोष्टीचा ट्रेन्ड पाहायला मिळत आहे, त्याचं नाव आहे व्हजायनल स्टीमिंग (Vaginal Steaming). सध्या महिलांमध्ये ही गोष्ट प्रचंड पॉप्युलर होत आहे. फिमेल प्रायव्हेट पार्ट टाइट करण्यासाठी आणि यंग लूक देण्यासाठी महिला व्हजायनल स्टीमिंगचा आधार घेतात. या प्रोसेसमध्ये व्हजायना स्वच्छ करण्यासाठी स्टीम म्हणजेच वाफ देण्यात येते. यामुळे फिमेल प्रायव्हेट पार्ट हेल्दी राहतो. या प्रोसेसला व्ही-स्टीमिंग किंवा योनी स्टीमिंग असंही म्हटलं जातं.
व्हजायनल स्टीमिंगचा ट्रेन्ड महिलांमध्ये पॉप्युलर होत असून हे व्हजायनासाठी अत्यंत हेल्दी ठरतं असंहा दावा अनेकांकडून करण्यात येत आहे. परंतु, याच ट्रेन्डमुळे फिमेल प्रायवेट पार्ट्सला फायद्याऐवजी नुकसान होत आहे. या प्रोसेसमुळे एका महिलेला प्रायव्हेट पार्टला भाजलं आहे.
एका ऑनलाइन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, ही घटना एका कॅनडियन महिलेसोबत घडली आहे. ही महिला घरीच व्हजायनल स्टीमिंग घेत होती. त्यानंतर तिला सेकंड डिग्री बर्न होऊन तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये स्टीममुळे भाजलं.
दरम्यान, मेडिकल न्यूज टुडे नावाच्या एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाजायनल स्टिमिंगचे अनेक फायदेही आहेत. यामुळे इन्फर्टिलिटीपासून मासिक पाळीमध्ये होणाऱ्या डिसकम्फर्टवर उपचार करण्यासाठी मदत करते.
व्हजायनल स्टीमिंग हेल्दी असल्याचा दावा करण्यात येत असला तरिही ही प्रक्रिया करण्याआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. फिमेल प्रायव्हेट पार्ट अत्यंत सेन्सिटिव्ह असतो. तसेच त्या भागातील त्वचाही अत्यंत नाजूक असते. या प्रोसेसमध्ये करण्यात येणाऱ्या स्टीमिंगमुळे भाजण्याचा धोका आणखी वाढतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.