पॉलिथीनमध्ये पॅक भाज्या, डाळी आणि ज्यूसमुळे होऊ शकतो हा गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 03:37 PM2023-12-06T15:37:42+5:302023-12-06T15:40:01+5:30
मेडिसीन विभागाने डायबिटीसच्या इतर कारणांबाबत माहिती मिळवण्यासाठी गर्भवती महिलांवर अभ्यास सुरू केला होता.
पॉलिथीनमध्ये पॅक केलेलं जेवण, भाज्या-डाळी आणि पॅक्ड ज्यूस किंवा बिस्कीटमुळे तुम्ही गंभीर आजाराचे शिकार होऊ शकता. यासंबंधी एक दावा आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजच्या रिसर्चमध्ये करण्यात आला. रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या महिलांनी गर्भावस्थेत प्लास्टिक गोष्टींमध्ये पॅक जेवण केलं, त्यांना गेस्टेशनल डायबिटीसचा धोका अधिक होता.
एक वेबसाइटवरील वृत्तानुसार, मेडिसीन विभागाने डायबिटीसच्या इतर कारणांबाबत माहिती मिळवण्यासाठी गर्भवती महिलांवर अभ्यास सुरू केला होता. एकूण 50 महिलांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. यातील 30 महिलांची सॅम्पलिंग करण्यात आली. यातील पाच महिलांना गर्भावस्थेदरम्यान गेस्टेशनल डायबिटीस आढळून आला. सामान्यपणे चार ते 18 टक्के गर्भवती महिला या डायबिटीसच्या शिकार होतात. चांगली बाब ही आहे की, प्रसुतीनंतर 90 टक्के महिलांमध्ये हा डायबिटीस आपोआप नष्ट होतो.
रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या महिलांना गेस्टेशनल डायबिटीस होता, त्यांना प्लास्टिकच्या गोष्टींमध्ये पॅक्ड अन्न खाण्याची सवय जास्त होती. या महिलांनी सांगितलं की, त्या नेहमीच प्लास्टिकच्या ताटात, ग्लास, वाटीमध्ये जेवण करत होत्या. त्या भाज्या, डाळी, ज्यूस किंवा बिस्कीटही नेहमीच पॉलिथीनमध्ये पॅक करून नेत होत्या.
प्लास्टिकने डायबिटीसचा धोका कसा?
रिसर्चमध्ये आढळून आलं की, प्लास्टिक आणि पॉलिथीनमध्ये 'बिस्फेनाल-ए' (बीपीए) नावाचं केमिकलचा वापर केला जातो. हे केमिकल अन्नात मिक्स होऊन अनेक प्रकारच्या आजारांचं कारण बनू शकतं.
बिस्फेनाल-ए काय आहे?
बिस्फेनाल-ए एक हार्मोन डिस्टर्बिंग केमिकल आहे. याने शरीरातील हार्मोन्स प्रभावित होतात. यामुळे इन्सुलिनच्या उत्पादनात अडथळा येऊ शकतो. इन्सुलिनही एक हार्मोन आहे, जे शरीरात ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतं. बीपीएच्या प्रभावाने ब्लड शुगर लेवल वाढण्याचा धोका वाढतो आणि डायबिटीसही होऊ शकतो.