डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान आहेत या भाज्या, स्वस्तात होईल मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 12:45 PM2023-08-22T12:45:01+5:302023-08-22T12:45:21+5:30

Diabetes Patients Diet: या भाज्या खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. आज आम्ही तुम्हाला  याच भाज्यांबाबत सांगणार आहोत. डायबिटीसच्या रूग्णांनी या भाज्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये करावा. 

Vegetables which are beneficial for diabetes patients can eat daily | डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान आहेत या भाज्या, स्वस्तात होईल मोठा फायदा!

डायबिटीसच्या रूग्णांसाठी वरदान आहेत या भाज्या, स्वस्तात होईल मोठा फायदा!

googlenewsNext

Diabetes Patients Diet: शुगर म्हणजे डायबिटीसचा आजार गेल्या काही काळापासून जगभरातील लोकांना शिकार बनवत आहे. तरूणही सहजपणे या आजाराचे शिकार होत आहेत. अशात नेहमीच हेल्थ एक्सपर्ट्स असा सल्ला देतात की, आपल्या लाइफस्टाईलमध्ये बदल करून  तुम्ही तुम्ही हा आजार काही प्रमाणात कंट्रोल करू शकता. कारण यावर कोणताही ठोस उपाय नाही. पण अनेकदा लोक शुगरचे शिकार यामुळेही होतात की, कारण मानसिक तणावाचे शिकार असतात.

Diabetes Patients Diet: डायबिटीसच्या रूग्णांची डाएट सामान्यांपेक्षा थोडी वेगळी असते. रूग्णांनी याची काळजी घेतली पाहिजे की, त्यांनी काय खावं आणि काय खाऊ नये. जास्तीत जास्त रूग्णांना आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश करावा लागतो. याद्वारे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. काही भाज्या तर डायबिटीस रूग्णांसाठी वरदान असतात. 

या भाज्या खाल्ल्याने ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. आज आम्ही तुम्हाला  याच भाज्यांबाबत सांगणार आहोत. डायबिटीसच्या रूग्णांनी या भाज्यांचा समावेश आपल्या डाएटमध्ये करावा. 

1) भेंडी

भेंडी डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. यात फायबर भरपूर असतं. भेंडी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल मेंटेन राहते. सोबतच भेंडीमध्ये आढळणारं फायबर आतड्यांमध्ये जाऊन शुगर अब्जॉर्बशन हळूवार करतं. तसेच भेंडी स्वस्तात मिळते. 

2) टोमॅटो 

टोमॅटोचा वापर सगळ्या भाज्यांमध्ये केला जातो. जास्तीत डाळी आणि भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. डायबिटीसच्या रूग्णांसाठी टोमॅटो फार फायदेशीर ठरतं. टोमॅटोमध्ये लायकोपीन तत्व आढळतं जे एक अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. तसेच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा असतं. हे खाल्ल्याने इम्यूनिटी बूस्ट होते.

3) पालक

पालक भाजी आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पालक भाजीमध्ये आयरन भरपूर असतं. डायबिटीसच्या रूग्णांसाठी ही भाजी फार फायदेशीर मानली जाते. एका स्टडीनुसार, पालक इन्सुलिन सेंसिटिव्हीटी वाढवण्यास मदत करते. हवं तर तुम्ही पालकचा ज्यूस बनवूनही पिऊ शकता. डायबिटीसमध्ये याचा फायदा मिळतो.

Web Title: Vegetables which are beneficial for diabetes patients can eat daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.