जास्त आनंदासाठी वायग्राला पडू नका बळी, नेहमीसाठी निकामी होऊ शकतात डोळे!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:12 PM2022-11-16T16:12:09+5:302022-11-16T16:13:01+5:30
अमेरिकेतील काही अभ्यासकांनी एका ३१ वर्षीय तरुणावर अभ्यास केला आणि सांगितले की, वायग्राच्या अतिसेवनामुळे तुमचे डोळे नेहमीसाठी खराब होऊ शकतात.
न्यूयॉर्क : लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचा वापर करतात, पण त्यांना याचे साईड इफेक्ट माहीत नसतात. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वायग्रा या औषधाच्या अतिसेवनामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीला नेहमीसाठी नुकसान होऊ शकता. पहिल्यांदाच एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
अमेरिकेतील काही अभ्यासकांनी एका ३१ वर्षीय तरुणावर अभ्यास केला आणि सांगितले की, वायग्राच्या अतिसेवनामुळे तुमचे डोळे नेहमीसाठी खराब होऊ शकतात.
३१ वर्षीय तरुण डॉक्टरांकडे इमरजन्सीमध्ये डोळ्यांची तक्रार घेऊन आला होता. त्याने सांगितले होते की, गेल्या दोन दिवसांपासून त्याला दोन्ही डोळ्यांनी सगळंकाही लाल दिसत आहे. त्याने हेही सांगितले की, त्याला ही समस्या वायग्रा घेतल्यानंतर काही वेळाने सुरु झाली. या औषधाचा नॉर्मल डोज घेतला तरी याने डोळ्यांना नुकसान होतं. पण २४ तासांत समस्या दूर होते.
एका रुग्णाने डॉक्टरांना सांगितले की, त्याने नॉर्मल डोज जास्त घेतला होता. त्यानंतर काही वेळाने त्याला ही समस्या सुरु झाली होती. नंतर त्या व्यक्तीच्या डोळ्यातील पडद्यावर टॉक्सिक्स आढळलं होतं आणि त्याच्या डोळ्यांना नेहमीसाठी इजा झाली. डॉक्टरांनुसार, याचा संबंधी लैंगिक क्रियेसाठीच्या औषधांशी होता. वेगवेगळ्या प्रकारचे उपचार केल्यावरही एक वर्षापर्यंत त्याचे डोळे ठीक होऊ शकले नाहीत.