आता 'या' जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठीही वापरली जाणार Viagra ची टॅबलेट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:35 AM2019-10-14T11:35:28+5:302019-10-14T11:38:32+5:30

निळ्या रंगाच्या Sildenafil या गोळीला वायग्रा म्हणूनही ओळखलं जातं. ही गोळी पुरूषांना होणारी इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी केली जाते.

Viagra Sildenafil could help in fighting Leukemia blood cancer | आता 'या' जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठीही वापरली जाणार Viagra ची टॅबलेट! 

आता 'या' जीवघेण्या आजाराच्या उपचारासाठीही वापरली जाणार Viagra ची टॅबलेट! 

googlenewsNext

निळ्या रंगाच्या Sildenafil या गोळीला वायग्रा म्हणूनही ओळखलं जातं. ही गोळी पुरूषांना होणारी इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी केली जाते. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, लवकरच या औषधाचा वापर ल्यूकीमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आणि इतरही काही प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारासाठी केला जाणार आहे.

वायग्रा हे औषध जेव्हा विकसित केलं गेलं होतं तेव्हा याचा मूळ उद्देश इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करणे हा नव्हता. पल्मोनरी आरट्रिअल हायपरटेंशन आजारांच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. हा एक हाय ब्लड प्रेशरसारखा आजार आहे. जो हार्ट आणि लंग्समधे असतो. 

रक्तवाहिन्या मोठ्या करण्यासाठी मदत करते वायग्रा टॅबलेट

सविस्तरपणे समजून घ्यायचं तर पल्मोनरी आरट्रिअल हायपरटेंशन(PAH) एक अशी स्थिती आहे. ज्यात लंग्समध्ये हायपरटेंशनची स्थिती निर्माण होते आणि तेव्हा फप्फुसापर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. अशा स्थितीत Sildenafil म्हणजेच वायग्रा औषध फुप्फुसात phosphodiesterase 5 इंजाइमवर काम करतं आणि ब्लड वेसल्स म्हणजेच रक्तवाहिन्या पसरवतं. याने लंग्सना आराम मिळण्यास मदत होते.

स्टेम सेल्स रिलीज करतं

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सॅंटा क्रूजच्या एका रिसर्च टीमकडे याबाबतची ठोस पुरावे आहेत की, इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या दूर करण्यासाठी वापरली जाणारी वायग्रा ब्लड स्ट्रीमच्या बोन मॅरोमध्ये स्टेम सेल्सला रिलीज करण्यास मदत करते. स्टेम सेल्स नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, सॅनोफीच्या स्टेम सेल मोबिलायजर मोजोबिल या औषधाला वायग्रासोबत दिलं गेलं तर हे औषध अधिक चांगलं काम करतं. पण हा रिसर्च सध्या केवळ उंदरांवर करण्यात आला आहे. लवकर मनुष्यांवरही याची टेस्ट केली जाणार आहे. 

कोलोरेक्टल कॅन्सरपासून बचाव

उंदरांवर वायग्राच्या इफेक्टवर रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांना आढळलं की, जर उंदरांच्या पिण्याच्या पाण्यातून वायग्राचा छोटा डोज रोज दिला गेला तर त्यांच्यात कोलोरेक्टल कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने कमी केला जाऊ शकतो. पण हा रिसर्च सद्या केवळ जनावरांवर करण्यात आलाय. लवकरच रूग्णांवर याची क्लिनिकल ट्रायल घेतली जाईल. आणि ज्या रूग्णांना कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका अधिक आहे. ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणाला हा आजार असेल अशा लोकांना प्रायोरिटी दिली जाईल.


Web Title: Viagra Sildenafil could help in fighting Leukemia blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.