Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 07:50 AM2017-06-13T07:50:10+5:302017-06-13T13:20:10+5:30
बऱ्याचजणांना जिम जाणे किंवा मॉडर्न वर्क-आउट करणे पसंत नाही. अशांसाठी शिल्पाने सांगितलेला "योगा" उत्तम पर्याय आहे.
बदलती जीवनशैली त्यात फास्टफूड खाण्याची सवय, यामुळे बहुतांश लोकांना पोटावर चरबी येण्याची समस्या भेडसावत आहे. पोटावर चरबीची वाढ म्हणजे फक्त आपल्या व्यक्तिमत्त्वातच अडथळा नव्हे तर सोबतच अनेक व्याधींना आमंत्रणदेखील होय.
पोटाची चरबी कमी करुन पोट सपाट करण्यासाठी सतत व्यायाम करणे आवश्यक आहे. मात्र¸ बऱ्याचजणांना जिम जाणे किंवा मॉडर्न वर्क-आउट करणे पसंत नाही. अशांसाठी योगा उत्तम पर्याय आहे.
आज आम्ही आपणास शिल्पा शेट्टीने सांगितलेले दोन सोप्या पर्यायांविषयी माहिती देत आहोत जे आपणास पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करतील.
पोटावरची चरबी करण्यासाठी पहिला सोपा पर्याय शिल्पाने आपणास सांगितला आहे तो म्हणजे पादहस्तासन.
* पादहस्तासन
पादहस्तासन करताना ऊर्ध्वनमस्कारात डोक्याच्या वर असणारे हात श्वास सोडत सोडत पायाच्या दोन्ही बाजूंना जमिनीवर ठेवून डोके गुडघ्यांना लावायचे असतात. यामुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण अधिक चांगल्या प्रकारे होते, प्राणशक्तीचा पुरवठा होतो, स्मरणशक्ती व आकलनशक्ती सुधारण्यास मदत मिळते. हृदय तसेच फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते, सायटिका वगैरे पायांच्या नसांसंबंधी त्रास होण्यास प्रतिबंध होतो, पायांची ताकद वाढते, पोट व कंबरेच्या ठिकाणची चरबी कमी होण्यास मदत मिळते. पोट व ओटीपोटावर दाब आल्याने स्त्रियांमध्ये पाळी नियमित येण्यास मदत मिळते.
दुसरा पर्याय शिल्पाने सांगितला आहे तो म्हणजे सुप्त मत्स्येन्द्रासन.
* सुप्त मत्स्येन्द्रासन
हे आसन केल्याने पोटाची चरबी कमी होऊन पोट सपाट होण्यास मदत होते. शिवाय पाठ आणि कंबरच्या मांसपेशींमध्ये ताण निर्माण होतो.
या आसनाने पाठीचा कणा ताठ होण्यास मदत होते आणि आरामही मिळतो. तसेच पचनसंस्था सुरळीत होऊन पोटाच्या मांसपेशी मजबूत होतात. शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघण्यास मदत होते.
Also Read : HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !
: HEALTH : वजन कमी करण्यासाठी पाण्याचा असा करा वापर !