शिमला मिरची खात असाल तर व्हा सावध, मिरची कापताच बाहेर आला एक जीव आणि....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:34 PM2024-06-01T13:34:17+5:302024-06-01T13:34:48+5:30
Shimla Mirch Thread Worm : एका व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात दाखवण्यात आल आहे की, महिलेने शिमला मिरची कापल्यावर त्यातून एक धाग्यासारखी वस्तू बाहेर बाहेर आली.
Shimla Mirch Thread Worm : शिमला मिरची(Shimla Mirch) भाजी किंवा शिमला मिरचीचा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये खूप वापर केला जातो. चायनीज फूड्समध्ये तर शिमला मिरची असतेच असते. ही भाजी नेहमीच लोक आवडीने खातात. पण सध्या शिमला मिरचीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून तुम्हाला धक्का बसेल. यापुढे शिमला मिरची खावी की नाही असा प्रश्नही पडू शकतो किंवा यापुढे शिमला मिरची खाताना तुम्ही खूप काळजी घ्याल.
एका व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात दाखवण्यात आल आहे की, महिलेने शिमला मिरची कापल्यावर त्यातून एक धाग्यासारखी वस्तू बाहेर बाहेर आली. धाग्यासारखी दिसणारी ही गोष्ट धागा तर अजिबात नाही. तर हा आहे थ्रेड वर्म (Thread Worm). जो नंतर बाहेर काढल्यावर हालचाल करतानाही दिसत आहे. हा थ्रेड वर्म शिमला मिरचीमध्ये आढळतो आणि फार घातकही असतो.
शिमला मिर्च खाने से पहले सावधान रहें.. pic.twitter.com/LCgRRivfAK
— 𝗞𝗿𝗶𝘀𝗵𝗻𝗮𝗣𝗿𝗲𝗲𝘁𝗶 (@Krishnavallabhi) May 28, 2024
सोशल मीडिया X वर @Krishnavallabhi नावाच्या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दावा करण्यात आला आहे की, जर हा थ्रेड वर्म मिरचीसोबत पोटात गेला तर पोटातील मोठ्या आतड्या खातो. याने इन्फेक्शन होतं आणि यामुळे तुमच्या जीवालाही धोका होऊ शकतो. तसेच शिमला मिरचीच्या बियांमध्ये याचे अंडेही असू शकतात. त्यामुळे शिमला मिरची खाताना काळजी घेण्यास सांगण्यात आलं आहे. शिमला मिरचीच्या बीया काढून टाकण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.