विद्या बालन म्हणते, राग आवरला मात्र अ‍ॅसिडीटी वाढली!

By admin | Published: May 26, 2017 07:02 PM2017-05-26T19:02:02+5:302017-05-26T19:02:02+5:30

आपल्याला नक्की कशानं अ‍ॅसिडीटी होते, हे आपण कधी शोधतो का?

Vidya Balan says, anger has increased but acid increases! | विद्या बालन म्हणते, राग आवरला मात्र अ‍ॅसिडीटी वाढली!

विद्या बालन म्हणते, राग आवरला मात्र अ‍ॅसिडीटी वाढली!

Next



- नितांत महाजन


‘मला प्रचंड राग यायचा, एकेकाळी तर खूप यायचा. पण करिअरच्या सुरुवातीला लोकांशी जुळवून घेण्याच्या काळात, लोकांनी आपल्याला स्वीकारावं, आपलं काम आवडावं म्हणून झगडण्याच्या काळात मी तो राग दाबला. मनातल्या मनातच ठेवला. पण त्या काळात मला अ‍ॅसिडीटीचा प्रचंड त्रास झाला. -अलिकडेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने हे सांगितलं. यश-अपयश स्वीकारण्याच्या, हाताळण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल ती बोलत होती.
आणि ते वाचताना वाटतं की, आपलं तरी दुसरं काय होतं? आपल्यापैकी अनेकांना अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. प्रचंड त्रास होतो. छातीत जळजळ, मळमळ, नॉशिया, भूक लागत नाही, उलट्या होतात, पोटात दुखतं, डोकं दुखतं असे किती प्रकार. आपणही तात्पुरते अ‍ॅण्टासिड औषधं घेवून ते सारं दाबून टाकतो. किंवा फार्फार तर गार दूध पिवून त्रास कमी होईल असं पाहतो. पण तरी अ‍ॅसिडीटी काही पाठ सोडत नाही. इतरांना तो आजार गंभीर वाटत नाही, पण आपल्याला होणारा त्रास आपणच जाणून असतो.
त्यावेळी काय करायचं?
विद्या म्हणते तसं आपल्या अ‍ॅसिडीटीचं मूळ शोधलं पाहिजे. ते मूळ शोधलं तर ते कारण वजा करुन आपल्याला आपल्या अ‍ॅसिडीटीला कण्ट्रो करता येवू शकतं.

१) आपला स्वभाव चिडचिडा आहे का?
आपण खूप चिडचिडे असू, राग येत असेल तरी अ‍ॅसिडीटी वाढते. आणि आपली अ‍ॅसिडीटी वाढली तरी आपल्याला खूप राग येतो. हे चक्र आहे.

२) वेळी अवेळी जेवण?
आपण कधीही जेवतो, दोन जेवणात खूप अंतर असतं का? अती जेवतो का? तसं असेल तरी अ‍ॅसिडीटी होते.

३) मसालेदार खाणं?
अती मसालेदार, चमचमीत खाण्यानं, जंक फूड, सोडायुक्त पेय यासाऱ्यानंही अ‍ॅसिडीटी वाढते.

४) व्यायामाचा अभाव?
काहीच व्यायाम नाही, बैठं काम. खाणं चिक्कार, सतत खाणं, हालचाल शून्य, अ‍ॅसिडीटी होणारच.

५) मनात कुढणं?
आपण मनातल्या मनात फार कुढत असलो, मनमोकळं केलं नाही, सतत मनात जळफळत असलो तरी आपलं पित्त खवळतं.

६) यापैकी एक किंवा यासाऱ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं खवळलेलं पित्त. त्याचं कारण कळलं तर ते कारण नष्ट करून किंवा कमी करुन आपलं पित्त आटोक्यात ठेवता येतं.

Web Title: Vidya Balan says, anger has increased but acid increases!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.