​विनोद खन्नाला होता ब्लॅडर कॅन्सर, आपणासही "या" सवयी असतील तर आधीच व्हा सावध !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 04:53 AM2017-04-28T04:53:48+5:302017-04-28T10:23:48+5:30

बदलत्या जीवनशैलीनुसार हा कॅन्सर कुणालाही होऊ शकतो, मात्र या कॅन्सरला काही संकेतानुसार ओळखल्यास पहिल्या स्टेजवरच सतर्क होता येते. जाणून घ्या कोणती आहेत लक्षणे..!

Vinod Khanna had bladder cancer, if you have "these" habits, be aware of it already! | ​विनोद खन्नाला होता ब्लॅडर कॅन्सर, आपणासही "या" सवयी असतील तर आधीच व्हा सावध !

​विनोद खन्नाला होता ब्लॅडर कॅन्सर, आपणासही "या" सवयी असतील तर आधीच व्हा सावध !

googlenewsNext
ong>-Ravindra More
बॉलिवूडचा दयावान विनोद खन्नाचे गुरुवारी निधन झाले. त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता आणि मुंबईच्या एचएन रिलायन्स फाउंडेशन एंड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होता. विनोद खन्नाचे ज्या कारणाने निधन झाले ते म्हणजे ब्लॅडर कॅन्सर. जाणून घेऊया या कॅन्सरविषयी...
ब्लॅडरच्या वॉलच्या टिश्यूजला इंफॅक्टेड होणे आणि त्याठिकाणी रक्ताच्या गाठी तयार होणे ही कॅन्सरची सुरुवात समजावी. ब्लॅडर आपल्या यूरिनरी सिस्टमचा एक भाग असतो जो किडनीकडून येणाऱ्या यूरिनला कलेक्ट करतो. यूरिन येथूनच शरीराच्या बाहेर निघते. नॅशनल इंस्टीट्यूट आॅफ हेल्थच्या अभ्यासानूसार ही समस्या ६० वर्षावरील पुरुषांमध्ये जास्त आढळते. या कॅन्सरला काही संकेतानुसार ओळखल्यास पहिल्या स्टेजवरच सतर्क होता येते. 

* काय आहेत या कॅन्सरची लक्षणे
१) लघवीद्वारे रक्त येणे
लघवीद्वारे रक्त येत असेल तर हे ब्लॅडर कॅन्सर असण्याचे लक्षण आहे. 

२) वजन घटणे
कारण नसताना वजन घटत असेल तर समजावे की हे ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण आहे. 

३) कंबर दुखी
सतत कंबर दुखीचा त्रास असल्यास हे ब्लॅडर कॅन्सर असण्याचे लक्षण आहे. 

४) थकवा जाणवणे
नेहमी थकवा जाणवणे आणि अशक्त वाटणे हेदेखील यूरिनरी ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण आहे. 

५) लघवीद्वारे सफेद टिश्यूज जाणे
लघवीद्वारे सफेद टिश्यूज किंवा सफेद डिस्चार्ज होणे ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. 

६) यूरिन इन्फेक्शन
वारंवार यूरिन इन्फेशनचा त्रास होणे हे ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. 

७) पोट दुखी
नेहमी पोटाच्या खालच्या भागात दुखत असल्यास ब्लॅडर कॅन्सरचे लक्षण समजावे.

८) हाडांचे दुखणे
सतत हाडांचे दुखणे हेदेखील ब्लॅडर कॅन्सर होण्याचे लक्षण आहे. 

* कोणाला होऊ शकतो हा कॅन्सर
१) ज्यांचे वर ६० वर्षापेक्षा जास्त आहे.

२) ज्यांचे वजन जास्त आहे.

३) जे जास्त स्मोकिंग(धुम्रपान) करतात.

४) जे जास्त मद्यपान करतात.

Also Read : ​पुरुषांनो! १० तासांपेक्षा जास्त झोपल्यामुळे वाढतो कॅन्सरचा धोका
                    SHOCKING : ​कॅन्सरचा संबंध ‘सेक्स’शी, जाणून घ्या कसा?

Web Title: Vinod Khanna had bladder cancer, if you have "these" habits, be aware of it already!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.