‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:10 AM2018-02-09T06:10:51+5:302018-02-09T06:11:01+5:30

शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे.

Viral fever, colds, cough and respiratory problems | ‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास

‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास

मुंबई : शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बºयाच मुंबईकरांना ‘व्हायरल’ तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.
शहर-उपनगरात दुपारी उनाचा कडाका असतो. मध्येच ढग दाटून येतात. सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो. वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाºया रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहर-उपनगरात पहाटे असणारा वातावरणातील गारठा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव १२ वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे.
>उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे
हवेतून पसरणाºया साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाºयांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो.
- डॉ. शुभदा शाह, फिजिशिअन
>काळजी घ्या
व्हायरस अ‍ॅक्टिव्ह होत असल्याने टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या.
रुमाल बाळगावा, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अपूर्वा मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>उपाय
डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या.
शिंक आल्यास किंवा खोकताना रुमाल वापरा
नाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या
>कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा

अतितेलकट, थंड, आंबट टाळा

आहार चांगला व वेळेत घ्या

Web Title: Viral fever, colds, cough and respiratory problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई