Viral Fever दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 10:17 AM2018-09-12T10:17:54+5:302018-09-12T10:19:21+5:30

वायरल इन्फेक्शनला अधिक प्रमाणात तापाचं नावं दिलं जातं. पण मुळात वायरल ताप इम्यून सिस्टीमला कमजोर करतं.

Viral fever symptoms, causes, diagnosis, treatment and home remedies | Viral Fever दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

Viral Fever दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम!

googlenewsNext

वातावरणात बदल झाल्याने वायरल ताप येतो. तापमानाची चढ-उतार होत असल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होते आणि त्यामुळे वायरल ताप तुम्हाला कचाट्यात घेतो. वायरल इन्फेक्शनला अधिक प्रमाणात तापाचं नावं दिलं जातं. पण मुळात वायरल ताप इम्यून सिस्टीमला कमजोर करतं. त्यामुळे वायरल संक्रमण वेगाने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. 

याच्या लक्षणांमध्ये ताप, डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी, अंगदुखी, घशात वेदना, खोकला, थकवा, सांधेदुखी, उलटी, पोटाची समस्या तसेच डोळे लाल होणे आणि कपाळ गरम होणे यांचा समावेश आहे. पण हा वायरल ताप दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केला जाऊ शकतात. 

१) लसूण

लसणाचे अनेक फायदे असतात. लसणामध्ये असे काही तत्व असतात जे वायरल तापाचा प्रभाव कमी करतं. याचा वापर करण्यासाठी ३ ते ४ लसणाचे तुकडे गरम पाण्यामध्ये उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे आणि सोबतच लसणाचे तुकडेही खावे.

२) कोंथिबीर किंवा धने

कोथिंबीर अनेक प्रकारचे वायरल इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतं. वायरल ताप आल्या धन्यांचं सेवन केल्यास वायरल ताप दूर होतो.

३) आलं

आलं हे अंगदुखी आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वायरल ताप असेल तर याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी आल्याच्या पेस्टमध्ये थोडं मध मिश्रित करुन थोड्या थोड्या वेळाने सेवन करा याने तुम्हाला आराम मिळेल.

४) मेथी

मेथी सुद्धा वायरल ताप कमी करण्यास मदत करते. यासाठी मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावे. या पाण्याचं सेवन प्रत्येक २ तासांनी करणे फायद्याचं ठरेल.

५) लिंबू आणि मध

लिंबू आणि मधाच्या सेवनामुळे वायरल ताप कमी होण्यास मदत मिळते. दोन्ही एकत्र करुन याचं सेवन केल्यास वायरल ताप लवकर कमी होऊ शकतो.

या गोष्टींची घ्या काळजी

जर वातावरण बदलामुळे तुम्ही वायरल तापाच्या कचाट्यात आले असाल आणि त्यावर उपाय म्हणून वरील गोष्टी वापरत असाल तर आधी एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत आणि याच्या सेवनाने कुणाला अॅलर्जी असेल तर अडचण वाढू शकते.
 

Web Title: Viral fever symptoms, causes, diagnosis, treatment and home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.