टीझर अॅण्ड ट्रेलरचा व्हायरल ट्रेन्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2016 04:28 PM2016-03-31T16:28:29+5:302016-03-31T09:28:29+5:30
दोन ते तीन महिन्यात आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये फेसबुक, यू-टयूब, इन्स्टा यांसारख्या सोशलवेबसाइडच्या माध्यमातून टिझरची क्रेझ पाहायला मिळत आहे
ब लीवुड असो वा मराठी इंडस्ट्री याठिकाणी आगामी चित्रपटासांठी प्रेक्षकांना आकर्षित करता यावे यासाठी वापरले जाणारे प्रमोशन फंडे म्हणजे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये पूर्वी प्रमोशनचे हे फंडे तितकेसे प्रसिद्ध नव्हते. काही वर्षापूर्वी देखील चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ट्रेलर प्रचलित होता. पण गेली दोन ते तीन महिन्यात आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये फेसबुक, यू-टयूब, इन्स्टा यांसारख्या सोशलवेबसाइडच्या माध्यमातून टिझरची क्रेझ पाहायला मिळत आहे. थोडक्यात, प्रमोशन फंडयाची ही परिस्थीती पाहता असेच म्हणावे लागेल की, सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हायरल ट्रेन्ड निर्माण झला आहे.
मराठी चित्रपटांच्या या ट्रेन्डच्या माध्यमातून प्रेक्षक,रसिक मायबापापर्यत चित्रपटांची ओळख जरी पोहोचत असेल तरी नेमकी टीझर ही काय पद्धत आहे. याची कल्पनादेखील मराठी प्रेक्षकांना माहित नसल्याचे दिसते. बॉलीवुड चित्रपटांचा ट्रेलर पूर्वीपासूनच होत असल्यामुळे हा प्रकार मराठी इंडस्ट्रीमध्ये दाखल झाला त्यामुळे त्याचे ऐवढे नाविण्य नव्हते. पण गेल्या काही महिन्यात मराठी इंडस्ट्रीमध्ये बॉलीवुडपेक्षा ही जलद गतीने टीझरचे प्रमाण वाढले असल्यामुळे प्रेक्षक देखील विचारात पडले आहे की, टीझर म्हणजे नेमके काय आहे? याविषयी लोकमत सीएनएक्सने दिग्दर्शक सुजय डहाके आणि प्रकाश कुंटे यांच्याशी साधलेला संवाद.
शाळा, फुंतरू यासारखे सुपरहिट चित्रपट देणारा तरूण दिग्दर्शक सुजय डहाके म्हणतो, टीझर व मोशन पोस्टर हे हॉलीवुड कन्स्पेट आहे. पण सध्या आपल्याकडे टीझरचा व्हायरल ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. टीझर म्हणजे चित्रपट चार ते पाच महिन्यांपूर्वी प्रदर्शित होण्याआधी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी चित्रपटाची फक्त ओळख उलगडली जाते. या चित्रपटात अभिनेता, अभिनेत्री व इतर कलाकार कोण असणार आहे याची माहिती सांगितली जाते. तर ट्रेलरमध्ये चित्रपट न कळता सेटअप काय, एखादा डायलॉग किवा लोकेशन म्हणजेच थोडक्यात चित्रपटातील काही आकर्षित दृश्य झळकविली जातात. यानंतर येणारा मोशन पोस्टर ही पद्धत हॉलीवुडमध्ये खूप रूढ आहे.पण आपल्याकडे तितकी रूढ नाही.यामध्ये अॅनिमेशनच्या माध्यमातून चल चित्र म्युझिक बॅकराउंडच्या माध्यमातून प्रदर्शित केले जाते.आगामी चित्रपटासाठी आॅडीयन्स जमा करण्यासाठी प्रमोशनचे हे फं डे वापरले जातात. हे फंडे वापरले तर चित्रपटाच्या प्रसिद्धीचा अंदाज देखील बांधता येतो.
तरूणांच्या मनावर राज्य करणारा चित्रपट कॉफी आणि बरचं काही तसेच आगामी चित्रपट अॅण्ड जरा हटकेचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले की, आगामी चित्रपटाचे टीझर आणि ट्रेलर हे प्रदर्शित केलेच पाहिजेत. चित्रपटाचे दोन मिनीटाचे फुटेज हे व्हायरल करणे आवश्यक आहे. कारण प्रेक्षकांना काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. काही दिलखेचक फुटेज टिझर, ट्रेलरच्या माध्यमातून दाखविले तरच प्रेक्षक बॉक्सआॅफीसपर्यत पोहोचू शकतो. थोडक्यात सांगायचं तर, हे एका इनव्हीटेशन कार्डप्रमाणे असते. जसे की,लग्नाच्या पत्रिकेच्या एनव्हलपवर वधू व वराचे नाव म्हणजे टीझर. आणि ट्रेलर म्हणजे विवाहाच्या ठिकाणी काय काय पाहायला मिळणार याची माहिती.
यावरून असे दिसते की, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पोस्टर, टीझर, ट्रेलर यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची चर्चा राहते. तसेच पोस्टर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाचा विसर पडू नये यासाठी टीझर हे खादय दिले जाते. चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठयावर आला असेल तर त्याला अधिक गर्दी खेचण्यासाठी चित्रपटातील एखादया दिलखेचक फुटेजचा ट्रेलर दाखविला जातो. जसे की, लय भारी या चित्रपटातील सर्वाच्या ओठी असणारा प्रसिद्ध डायलॉग आपला हात भारी...लाथ भारी...च्या.. मायला सगळचं लय भारी यांसारखे डायलॉग चित्रपटांच्या ट्रेलरच्या माध्यमातू दाखविले तर प्रेक्षक नक्कीच आकर्षित होतात. सध्या वृंदावन, रेती, रंगापंतगा, लॉस्ट अॅण्ड फाउंड, बॅन्जो, सैराट या आगामी चित्रपटांनी सोशलमिडीयावर टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांना मोहात पाडून ठेवले असल्याचे चित्र दिसत आहे.
मी देखील फुंतरू या चित्रपटाचा पोस्टर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एका वर्षा आधि प्रदर्शित केला होता. आणि ट्रेलर चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक महिन्यापूर्वी प्रदर्शित केला होता. त्यामुळे या प्रमोशन फंडाचा उपयोग बॉक्सआॅफीवर देखील झालेला दिसून आला.
सुजय डहाके (दिग्दर्शक)