काय सांगता! चक्क आता व्हायरस दुर करेल अंधत्व, संशोधनातून दिलासादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 03:09 PM2021-11-09T15:09:25+5:302021-11-09T15:09:32+5:30

सध्या कोरोनामुळे आपल्याला बऱ्याच लहान मोठ्या गोष्टींना तोंड द्यावे. या महामारीमुळे कित्येक लोकांना आर्थिदृष्टया अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण सगळेच व्हायरस वाईट नसतात.  नुकतंच एका वृत्तानुसार असं समोर आलं आहे की, एका व्हायरसनं चक्क आपले अंधत्व दूर होईल.

virus will cure your blindness new research tells | काय सांगता! चक्क आता व्हायरस दुर करेल अंधत्व, संशोधनातून दिलासादायक माहिती समोर

काय सांगता! चक्क आता व्हायरस दुर करेल अंधत्व, संशोधनातून दिलासादायक माहिती समोर

googlenewsNext

आजकाल व्हायरस आलाय व्हायरस आलाय, असं ऐकलं की नुसती मनामध्ये धडकी भरते. याच कारण सद्यस्थिती. सध्या कोरोनामुळे आपल्याला बऱ्याच लहान मोठ्या गोष्टींना तोंड द्यावे. या महामारीमुळे कित्येक लोकांना आर्थिदृष्टया अडचणींना सामोरे जावे लागले होते. पण सगळेच व्हायरस वाईट नसतात.  नुकतंच एका वृत्तानुसार असं समोर आलं आहे की, एका व्हायरसनं चक्क आपले अंधत्व दूर होईल.

ही खरंच चकीत करणारी गोष्ट आहे. या व्हायरस चा शोध युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्ग स्कूल या शाळेतील मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी लावला आहे. जो व्हायरास चक्क viruses solution to blindness अंधत्व दूर करणारा आहे. हे एका जीन थेरेपीच्या शोधातून या शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. जीन थेरपी म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राद्वारे शोधून काढण्यात येणारे रोगांचे उपचार. जी आनुवंशिक रोगांच्या उपचरांवर लक्ष केंद्रित करते.

या व्हायरस बद्दल eLife ने एक वृत्त प्रसारित केले आहे. ज्यात असे सांगण्यात आले आहे की , अंधत्व दुर करण्यासाठी या जीन थेरपीच्या माध्यमातून व्हायरस तयार करण्यात येणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पीट्सबर्ग मधील शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, कशाप्रकारे माणसांना जीन थेरपी उपयोगाची असते. आणि त्याचा फायदा कशाप्रकारे लोकांना होतो, हे त्यांनी या वृत्तात सांगितले आहे.

पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन या शाळेतील मेडिकल अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि नेत्ररोगशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक ली बर्न यांनी सांगितले की अंधत्वाने खूप गोष्टींवर फरक पडतो. अंधत्व ही कॅन्सर सारखी समस्या आहे जी समस्या कधी बरी होईल हे सांगता येत नाही. मात्र त्यासाठीच नेत्रसुख सर्वांना प्राप्त झाले पाहिजे, अशी एक नविन कल्पना लवकरच येणार आहे. ते असेही म्हणाले जीन थेरपीच्या माध्यमातून होणारी ही नवीन कल्पना आहे.

मोतबिंदू आणि अंधत्व यावर ही जीन थेरपी काम करेल. आज यरोप आणि अमेरिकेत ही थेरपी वर काम करण्यात सुरवात करण्यात आली आहे. लवकरच जीन थेरपीच्या माध्यमातून यावर उपचार सुरू करण्यात येईल.

Web Title: virus will cure your blindness new research tells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.