देवयानी हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:52+5:302016-04-25T00:27:52+5:30

पुणे : रोटरी क्लब गांधीभवन आणि ओरलीकोन बालझर या कंपनी तर्फे देवयानी हॉस्पिटल ला नुकतेच एक डायलिसिस मशीन भेट दिले. या मशीनच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशनकार्ड असणार्‍या रुग्णांना शासनाच्या राजीव गांधी योजनेअंतर्गत डायलिसिसची मोफत सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय इतर रुग्णांना सवलतीच्या दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे रुग्णालयाचे प्रमुख अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग लिमये यांनी सांगितले.

Visit Dialysis Machine at Devyani Hospital | देवयानी हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

देवयानी हॉस्पिटलला डायलिसिस मशीन भेट

Next
णे : रोटरी क्लब गांधीभवन आणि ओरलीकोन बालझर या कंपनी तर्फे देवयानी हॉस्पिटल ला नुकतेच एक डायलिसिस मशीन भेट दिले. या मशीनच्या माध्यमातून पिवळे व केशरी रेशनकार्ड असणार्‍या रुग्णांना शासनाच्या राजीव गांधी योजनेअंतर्गत डायलिसिसची मोफत सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय इतर रुग्णांना सवलतीच्या दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे रुग्णालयाचे प्रमुख अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग लिमये यांनी सांगितले.
याबरोबरच रुग्णालयामध्ये बायपास सर्जरी, व्हॉल्व रिप्लेसमेंट, अँजिओप्लास्टी, गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे होणार्‍या शस्त्रक्रिया व मणक्याच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये राजीव गांधी योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याचेही डॉ. लिमये यांनी सांगितले. राजीव गांधी योजना ज्या रुग्णांना लागू नाही अशा रुग्णांसाठी पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत सामाजिक बांधिलकीतून उपचार करण्यात येतात असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहनही देवयानी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
त्यावेळी रोटरी क्लबच्या गांधीभवन शआखेचे प्रकाश भट व ओरलीकोन बालझर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविण शिरसे उपस्थित होते.

Web Title: Visit Dialysis Machine at Devyani Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.