व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे 'या' आजारांचा धोका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 04:39 PM2019-10-16T16:39:19+5:302019-10-16T16:40:05+5:30
व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचं सर्वात पहिलं लक्षणं म्हणजे, थकवा आणि अस्वस्थता.
व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचं सर्वात पहिलं लक्षणं म्हणजे, थकवा आणि अस्वस्थता. तसेच लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल्स, ज्या शरीरामध्ये रक्ताच्या मदतीने ऑक्सिजनचं वितरण करतात. व्हिटॅमिन बी12च्या कमतरतेमुळे त्यांना योग्य प्रकारे काम करणं अशक्य होतं.
शरीरासाठी कसं फायदेशीर ठरतं व्हिटॅमिन बी12?
- शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी कार्बोहायड्रेट्सचे रुपांतर ग्लुकोजमध्ये करण्यात मदत करते.
- शरीरातील चरबी आणि प्रथिन यांचा वापर करण्यास मदत होते.
- निरोगी त्वचा, केस, डोळे आणि यकृतासाठी बी 12 आवश्यक असतात.
- मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सामान्य कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते.
- शरीरातील प्रत्येक पेशीच्या चयापचय प्रक्रियेमध्ये आवश्यक असते.
का होते व्हिटॅमिन बी12 ची कमतरता...?
सेलियाक डिजीजसारख्या समस्या आणि हेल्थ प्रॉब्लेम्समुळे, लाइफ स्टाइलशी निगडीत सवयी, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या औषधांच्या सेवनाने व्हिटॅमिन बी12 ची समस्या उद्भवते. अशाप्रकारे शरीरामध्ये या पोषक तत्वाची कमतरता होते.
औषधांमुळे होते व्हिटॅमिन्सची कमतरता
सेलियाक व्यतिरिक्त पोटाच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे प्रोटॉन पम्प्स किंवा अशी औषधं ज्यांच्यामध्ये रॅटिडाइन हायड्रोक्लोराइड असतं. याचे सेवन बराच वेळ केल्याने व्हिटॅमिन बी12ची कमतरता निर्माण होते.
डायबिटीसच्या रूग्णांमध्ये होऊ शकते व्हिटॅमिन बी12 ची कमतरता
हाय ब्लड शुगर किंवा डायबिटीस रूग्णांमध्ये व्हिटॅमिन बी12ची कमतरता भासू शकते. दरम्यान, ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी देण्यात येणारं मेटफॉर्मिन औषधं देण्याआधी तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी12 चा स्तर तपासण्यात येतो.
(टिप : वरील स्रव समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)