व्हिटॅमिन 'सी' ची कमतरता ठरू शकते धोकादायक; डोळ्यांची दृष्टी जाण्याचाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 02:45 PM2021-05-28T14:45:28+5:302021-05-28T16:33:24+5:30
महिलांच्या शरीरात ७५ टक्के व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते तर पुरुषांच्या शरीरात ती ९० टक्के इतकी असते. आपले शरीर ना व्हिटॅमिन सी बनवू शकत ना साठवून ठेऊ शकत त्यामुळे आहारात रोज व्हिटॅमिन सी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय तोटे होऊ शकतात.
सद्य कोरोनाकाळात व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहित असेल. मात्र व्हिटॅमिन सी चे महत्त्व फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याइतपतच पुरेसे नसुन त्याचे अनेक परिणाम आपल्या शरीरावर होतात. महिलांच्या शरीरात ७५ टक्के व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते तर पुरुषांच्या शरीरात ती ९० टक्के इतकी असते. आपले शरीर ना व्हिटॅमिन सी बनवू शकत ना साठवून ठेऊ शकत त्यामुळे आहारात रोज व्हिटॅमिन सी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय तोटे होऊ शकतात.
जखमा हळू भरतात
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील जखमा भरण्यास वेळ लागतो. जखम झाल्यावर व्हिटॅमिन सी चा रक्तातील स्तर जखमेच्या खाली जातो. जखम भरून येण्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. तसेच कोलेजन व्हिटॅमिन सी न्युट्रोफिलसाठी देखील फायदेशीर असते. न्युट्रोफिल म्हणजे रक्तातल्या पांढऱ्या पेशी ज्या कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करतात. पण व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे या सर्व क्रियेत बिघाड होतो व जखम भरायला जास्त वेळ लागतो.
हिरड्यातून व नाकातून रक्त येणे
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हिरड्यांतून रक्त येण्याची समस्या भेडसावू शकते. एका संशोधनानुसार असे लक्षात आले की ज्यांच्या हिरड्यांतून रक्त येत होते त्यांनी दोन आठवडे द्राक्ष खाल्ल्यानंतर रक्त येणे बंद झाले. तसेच व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे नाकातून रक्त येण्याची समस्याही निर्माण होऊ शकते.
वजन वाढणे
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे वजन वाढण्याचीही शक्यता असते. कारण व्हिटॅमिन सी शरीरातील फॅटला उर्जेमध्ये बदलते. त्यामुळे शरीरातील फॅट विशेषत: पोटाची चरबी कमी होते.
रुक्ष आणि सुरकुत्या आलेली त्वचा
तुमच्या आहारात जर व्हिटॅमिन सी कमी प्रमाणात असेल तर तुमची त्वचा रुक्ष आणि सुरकुत्यांनी भरलेली दिसू शकते. तेच जर व्हिटॅमिन सीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास त्वचा तजेलदार होते व चमकु लागते.
थकवा आणि चिडचिडेपणा
व्हिटॅमिन सी शरीरात कमी असल्यास थकवा जाणवतो तसेच दिवसभर चिडचिडेपणा राहतो. १४१ लोकांवर केलेल्या संशोधनानुसार व्हिटॅमिन सी दिल्यावर त्या लोकांच्या शरीरातील थकवा आणि चिडचिडेपणा दूर झाला.
दृष्टीवर परिणाम
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुमच्या दृष्टीवर विपरीत परीणाम होऊ शकतो. तुमच्या आहारात जर व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात असेल तर तुमचे डोळे निरोगी राहतातच पण मोतीबिंदूचा त्रासही कमी होतो.