कोरोनाच्या भीतीनं तुम्हीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'ही' औषधं घेताय? FDA नं दिल्या सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:18 PM2020-08-12T17:18:22+5:302020-08-12T17:29:10+5:30

 FDA नं व्हिटामीन सी च्या ओव्हरडोज गोळ्यांची विक्री करत असलेल्या कंपन्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.

Vitamin c high doses intake could be risky during corona virus maharashtra fda warns | कोरोनाच्या भीतीनं तुम्हीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'ही' औषधं घेताय? FDA नं दिल्या सुचना

कोरोनाच्या भीतीनं तुम्हीसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय 'ही' औषधं घेताय? FDA नं दिल्या सुचना

Next

गेल्या चार महिन्यांपासून जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरासह भारतात कहर केला आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोक डॉक्टरांचा सल्ला न  घेता वेगवेगळ्या गोष्टींचे सेवन करत आहेत. FSSA नं काही  दिवसांपूर्वी व्हिटामीन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले  होतं. आता फूड ड्रग एडमिनिस्ट्रेशनं (FDA) व्हिटामीन्सच्या ओव्हरडोजवरून सुचना दिली आहे. FDA नं व्हिटामीन सी च्या ओव्हरडोज गोळ्यांची विक्री करत असलेल्या कंपन्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. काही कंपन्या १००० mg ची टॅबलेट तयार करत आहेत. प्रत्यक्षात त्या कंपन्यांना फक्त ५०० mg च्या टॅबलेट तयार करण्याची परवागनी मिळाली आहे.

FDA चे ज्वॉइंट कमिशनर सुनील भारद्वार यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिटामीन सी च्या ओव्हरडोसमुळे लोकांच्या आरोग्याचं नुकसान होत आहे. यामुळे काही कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सुनील भारद्वाज यांनी सांगितले की, लोक डॉक्टरांचा सल्ला न  घेताच कुटुंबातील लोकांसाठी, मित्रांसाठी व्हिटामीन सी च्या ओव्हरडोस गोळ्या विकत घेत आहेत.

कोरोनाचा कहर वाढल्यानंतर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामीन सी भरपूर प्रमाणात  घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून  देण्यात आला होता.  त्यामुळे बाजारात व्हिटामीन सी ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. या औषधांची मागणी वाढल्यानं मोठ्या प्रमाणावर उत्पादन केलं जात आहे.  दरम्यान आयसीएमआरनं व्हिटामीन सी ची औषधं ४० mg प्रतिदिवस अशी  RDA निर्धारित केली आहे. तरीही काही कंपन्या १०० mg टॅबलेट तयार करत आहेत. डोसचं प्रमाण जाणून न घेता ग्राहकांकडून खरेदी केली जात आहे.

मुंबईतील एका कोविड रुगणालयाच्या सीईओ डॉक्टर आफरीन सौदागर यांनी सांगितले की, ''आम्ही साधारणपणे महिलांना प्रतिदिवस व्हिटामीन  सी ची ९० mg टॅबलेट  घेण्याचा सल्ला देतो. पुरूषांना १०० mg औषधं दिली जात आहे. ५०० mg पेक्षा जास्त डोजची आवश्यकता  नसते.''  त्यामुळे व्हिटामीन सी किंवा व्हिटामीन डी कोणत्याही स्वरुपाच्या गोळ्या घेताना आधी डॉक्टरांचा सल्ला  घेणं आवश्यक आहे. तुम्ही रोजच्या आहारातूनही व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता.  जर डॉक्टरांनी व्हिटामीन्सच्या टॅबलेट घेण्यास सांगितले तरच अशा गोळ्याचे सेवन करा.

हे पण वाचा-

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

अवघ्या जगाचे डोळे असलेल्या लसीची चाचणी अपूर्ण; तरीही उत्पादनाला सुरूवात?, वाचा WHO ची प्रतिक्रिया

'या' ६ कारणांमुळे कोणालाही होऊ शकतो फुफ्फुसांचा कॅन्सर; वाचा लक्षणं आणि बचावाचे उपाय

Web Title: Vitamin c high doses intake could be risky during corona virus maharashtra fda warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.