कोरोनाशी लढण्याासठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवेल व्हिटामीन सी; वाचा आरोग्यवर्धक फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 10:04 AM2020-06-18T10:04:34+5:302020-06-18T10:22:50+5:30
व्हिटामीन सी मुळे रोगप्रतिकाररशक्ती चांगली राहते. व्हिटामीन सी हे फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते.
संपूर्ण देश कोरोना विषाणूंच्या माहामारीशी लढत आहे. भारतात ३ लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे. वाढतं संक्रमण लक्षात घेता आजारांशी लढण्यासाठी सुरक्षितता बाळगणं गरजेचं आहे. जगभरातून कोरोना विषाणूंवर करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास तुम्ही आजाराला हरवू शकता.कारण रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास शरीरात विषाणूंशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात.
आहारात व्हिटामीन सी युक्त पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. अनेक संशोधनातून दिसून आलं आहे की, व्हिटामीन सी मुळे रोगप्रतिकाररशक्ती चांगली राहते. व्हिटामीन सी हे फळांत आणि भाज्यांत आढळते. हे पाण्यात विरघळणारे असल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली की याचेही प्रमाण कमी होते. मानवी शरीरात हे आपोआप निर्माण केले जात नाही, त्यामुळे शरीरात बाहेरून पूरक प्रमाणात घेणे आवश्यक आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही कमतरता भरून काढू शकता.
व्हिटामीन सी मुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकता येऊ शकतात. त्यामुळे त्वचेवरही तेज येते. कारण टॉक्सिन्स बाहेर पडल्यामुळे शरीर ताजेतवाने राहते. व्हिटामीन सी मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व बी 12, आयरन, फोलेट,व्हिटामीन डी चं प्रमाण वाढण्यास मदत होते. शरीरातील चयापचय क्रिया, अनेक पेशींची वाढ , ऊर्जा, पचनसंस्था, मेंदूचे कार्य, हॉर्मोन आणि त्यांचे सुरळीत कार्य, पेशीचे संघटन आणि कार्य (स्नायू पेशी), कार्य यासाठी या जीवनसत्त्वाची मदत होते. नैराश्याला प्रतिबंध होतो.
एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की वयस्कर लोकांना रोज ६५ ते ९० मिलिग्राम व्हिटामीन सी खाण्याची आवश्यकता असते. आजारी व्यक्ती, गरोदर महिला तसंच गरोदर महिलांना रोज १२० मिलिग्राम व्हिटामीन सी ची आवश्यकता असते.
व्हिटामीन सी च्या सप्लिमेंट्सचे सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर ठरते. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा औषधांचे सेवन करणं उत्तम ठरेल. व्हिटामीन सी च्या सप्लीमेंट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटा संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पचनक्रियेवरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सप्लिमेंट्सच्या सेवनापेक्षा काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही या आजारांपासून लांब राहू शकता. लिंबू, संत्रे, मोसंबी, लिंबू, द्राक्षे, कोबी, फ्लॉवर, पालक आणि सर्व फळे आणि भाज्या यात व्हिटामीन सी असते. व्हिटामीन सी च्या सेवनाने हृदयासंबंधी आजारांपासून लांब राहता येऊ शकतं.
लठ्ठपणा ठरू शकतो कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं कारण; संसर्ग टाळण्याचा 'हा' आहे बेस्ट उपाय
फुफ्फुसांमध्ये जमा होणारी घाण लगेचच होईल दूर; नेहमी निरोगी राहण्यासाठी 'असा' घ्या आहार