'या' उपायाच्या मदतीने दम्यावर मिळवता येऊ शकतं नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 11:16 AM2019-03-13T11:16:52+5:302019-03-13T11:17:35+5:30
अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे.
अलिकडे अस्थमा म्हणजेच दमाने पीडित लहान मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे लहान मुलांचा खराब दिनक्रम आणि वातावरणातील वाढतं प्रदूषण आहे. लहान लहान मुला-मुलींना कमी वयातही हा आजार होत आहे. ही फार गंभीर बाब आहे. असे म्हटले जाते की, बदलत्या वातावरणात दम्याच्या रुग्णांनी स्वत:ची फार जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. तर एका नव्या रिसर्चनुसार, जर दमा असलेल्या रूग्णांनी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण घेतलं तर सहजपणे ते बदलत्या वातावरणात ते स्वत:ची चांगली काळजी घेऊ शकतात.
जर्नल ऑफ अॅलर्जी अॅन्ड क्लीनिकल इम्यूनोलॉजीमध्ये प्रकाशित एका नव्या रिसर्चनुसार, डाएटमध्ये कमी व्हिटॅमिन डी असल्याकारणाने दम्याने पीडित लहान मुलांची समस्या अधिक वाढू शकते. रिसर्चनुसार, ज्या लहान मुलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता असते त्यांच्यांवर सिगारेट आणि अगरबत्तीचा धुराचा इतर मुलांच्या तुलनेत अधिक नकारात्मक प्रभाव पडतो.
या रिसर्चमध्ये १२० दमाने पीडित शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग करण्यात आला होता. यात खासकरून तीन गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं. घरातील वायुप्रदूषणाचा स्तर, रक्तातील व्हिटॅमिन डी चं प्रमाण आणि दम्याची लक्षणे. इथे हेही जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं की, १२० मुलांपैकी अनेक मुलं-मुली हे जाडेपणाचे शिकार होते.
या रिसर्चमधून जे निष्कर्ष निघाले त्यातून असं समोर येतं की, जर तुमच्या घरात वायु प्रदूषण जास्त असेल, पण दम्याने पीडित लहान मुलाच्या शरीरात व्हिटॅमिन डी चं प्रमाण कमी असेल तर त्याला या वातावरणाशी ताळमेळ बसवण्याक जास्त अडचण येणार नाही. तेच जर जाडेपणाने पीडित मुलांना जर व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण दिलं गेलं तर त्यांच्यात आणखी व्यापक परिवर्तन बघायला मिळतं.
तसेच या रिसर्चमध्ये यावरही जोर देण्यात आला आहे की, उन्हात जास्त वेळ बसल्याने दम्याने पीडित मुलांना व्हिटॅमिन डी तर मिळेत पण त्यांच्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होईल. उन्हाच्या माध्यमातून व्हिटॅमिन डी घेण्याऐवजी मासे, मशरूम, संत्री अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून-फळांमधून व्हिटॅमिन डी द्यावं. कारण यांचे काही साइड इफेक्टही होणार नाहीत.
या रिसर्चच्या मुख्य अभ्यासिका सोनाली बोस सांगतात की, 'दमा एक असा आजार आहे ज्याचा कोणताही ठोस अशा उपचार नाही. मात्र अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, व्हिटॅमिन डी ने श्वाससंबंधी समस्या ठीक तर होणार नाही, पण त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं'.