दररोज कोवळे ऊन घ्या, अन्यथा 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 03:35 PM2021-12-15T15:35:53+5:302021-12-15T15:36:00+5:30

व्हिटॅमिन डीची कमतरता, जी आपण सूर्यप्रकाशाने सहज पूर्ण करू शकतो, त्याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच हाडे कमकुवत होतात.

vitamin d deficiency can lead to heart disease and heart attack | दररोज कोवळे ऊन घ्या, अन्यथा 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता

दररोज कोवळे ऊन घ्या, अन्यथा 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक येण्याची शक्यता

Next

हिवाळ्यात कोवळ्या उन्हात बसणे सर्वांनाच आवडते. दिवसाचा १५-२० मिनिटांचा सूर्यप्रकाश शरीरातील सुस्तपणा तर दूर करतोच पण शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता देखील पूर्ण करतो. आठवड्यातून दोन ते तीन दिवस १० ते १५ मिनिटे उन्हात बसून अनेक गंभीर आजार टाळता येतात.

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, व्हिटॅमिन डीची कमतरता, जी आपण सूर्यप्रकाशाने सहज पूर्ण करू शकतो, त्याचा हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो तसेच हाडे कमकुवत होतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार वाढू शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या अभ्यासात, सहमरी येथील युनिसाच्या ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्रिसिजन हेल्थच्या संशोधकांना असे आढळून आले की व्हिटॅमिन डीची कमतरता हृदयविकारास कारणीभूत ठरते. संशोधनात असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या लोकांना हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते.

कोणत्या देशांतील लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता जास्त असते ?
अभ्यासानुसार, ऑस्ट्रेलियातील अंदाजे २३ टक्के लोक, यूएसमध्ये २४ टक्के आणि कॅनडात ३७ टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. भारतातही ७०-८० टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजार
संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. एवढेच नाही तर त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. यासोबत केस गळणे, नैराश्य आणि चिंता ही देखील त्याची लक्षणे आहेत.

व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण करावी
व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी, तुम्ही दररोज सकाळी १०-१५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. जर तुम्हाला सन टॅन होण्याची शक्यता असेल तर तुम्ही सूर्याकडे पाठ करून सूर्यप्रकाश घ्यावा. याशिवाय तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात व्हिटॅमिन डी भरपूर आहे. व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारात मशरूम आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा

Web Title: vitamin d deficiency can lead to heart disease and heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.