व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे लागू शकते 'या' ड्रग्सचे व्यसन, संधोधकांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:45 PM2021-06-17T13:45:26+5:302021-06-17T13:47:09+5:30
आपले आयुष्य आरोग्यपुर्ण जगण्यासाठी आपले स्वास्थ उत्तम असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे आवश्यक असतात पण एक असे जीवनसत्व आहे ज्याची कमतरता आपल्याला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाऊ शकते.
आपले आयुष्य आरोग्यपुर्ण जगण्यासाठी आपले स्वास्थ उत्तम असणे गरजेचे आहे. आपल्या शरीराला सर्व जीवनसत्वे आवश्यक असतात पण एक असे जीवनसत्व आहे ज्याची कमतरता आपल्याला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाऊ शकते. होय तुम्ही बरोबर ऐकताय. संशोधकांचा असा दावा आहे की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे अफूचे व्यसन लागण्याची शकते. मैसाचुरेट्स जनरल हॉस्पिटलच्या संशोधकांनुसार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे अफूचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते. हा शोध सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रकाशीत झालेला आहे.
तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार आपल्याला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी सुर्यप्रकाशातून मिळते. मात्र व्हिटॅमिन डीची कमतरता सप्लीमेंट्सनी भरुन काढता येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण उन्हात जातो तेव्हा युव्ही किरणांमुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन नामक हार्मोनचा स्त्राव होतो. हे हार्मोन आपल्या शरीरात ड्रग्जप्रमाणे कार्य करते.
त्यांनी उंदरांवर याचे संशोधन केले. आणि त्यात असे आढळले की उंदारंना युव्हि किरणे जास्त मिळाल्यामुळे त्यांच्यात एंडोर्फिन जास्त स्त्रवते. एंडोर्फिनला फिल गुड हार्मोन म्हणूनही संबोधले जाते. जे आपल्याला उत्सावर्धक व एनर्जीटीक बनवते. जर आपल्या शरीराला सुर्यप्रकाश कमी मिळाला तर त्या हार्मोनचे कार्य भरुन काढण्यासाठी शरीराला अफूची तल्लफ लागते.
या संशोधनात संशोधकांनी ज्या उंदरांवर संशोधन केले त्या उंदरांच्या अन्नातील व्हिटॅमिन डी काढुन टाकले. त्यांच्या समोर आले की उंदरांना व्हिटॅमिन डी न मिळाल्यामुळे उंदीर मार्फिनचा शोध घेत आहेत.