टाईप 2 डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं 'व्हिटॅमिन डी'?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:37 PM2019-07-27T12:37:12+5:302019-07-27T12:37:36+5:30

खरचं... टाइप 2 डायबिटस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं का 'व्हिटॅमिन डी'? जाणून घेऊया काय आहे संशोधकांचं मत...

Vitamin d supplementation stops the progression of type 2 diabetes | टाईप 2 डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं 'व्हिटॅमिन डी'?

टाईप 2 डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं 'व्हिटॅमिन डी'?

googlenewsNext

तुम्हाला जर काही दिवसांपूर्वीच समजलं असेल की, तुम्ही टाइप-2 डायबिटीसने ग्रस्त आहात किंवा तुम्ही प्री-डायबीटीसच्या स्टेजमध्ये असाल तर, तुमच्यासाठी सप्लिमेंट म्हणून व्हिटॅमिन डीच्या गोळ्या फायदेशीर ठरतात. कारण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट्स डायबिटीस आणखी वाढविण्यापासून रोखतात. यूरोपियन जर्नल ऑफ इन्डोक्रिनोलॉजमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे.  

ग्लूकोज मेटाबॉलिज्म वाढवतं व्हिटॅमिन डी 

संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, व्हिटॅमिन डी सप्लिमेंटचा हाय डोस ग्लूकोज मेटाबॉलिज्म वाढवतं. ज्यामुळे डायबिटीसवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. खरं तर टाइप 2 डायबिटीस एक अशा आजार आहे, जो सध्या जगभरामध्ये थैमान घालत आहे. अनेक लोक डायबिटीसच्या समस्येने हैराण आहेत. जर तुम्हाला टाइप 2 डायबिटीज झाला तर त्यानंतर तुम्हाला अधत्व, किडनी फेलियर आणि हार्ट डिजीज यांसारख्या गंभीर आजार होण्याचा धोका अनेक पटिंनी वाढतो. 

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डायबिटीसचा धोका 

ज्या व्यक्ती प्री-डायबीटीज स्टेजमध्ये असतात म्हणजेच, ज्यांच्यामध्ये टाइप 2 डायबीटीस विकसित होण्याचा धोका अधिक आहे, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा किंवा अनुवंशिकता यांसारखे रिस्क फॅक्टर्स दिसून येतात. दरम्यान, याआधी करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधून व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे टाइप 2 डायबीटीस होण्याचा धोका वाढतो. 

सप्लिमेंट देण्याच्या आधी आणि नंतर करण्यात आली तपासणी 

संशोधनामध्ये सहभागी करण्यात आलेल्या सर्व लोकांची इन्सुलिन फंक्शन आणि ग्लूकोज मेटाबॉलिज्मला विटमिन डी सप्लिमेंटेशनचा हाय डोस देण्याआधी आणि 6 महिन्यानंतर तपासणी करण्यात आली. यामध्ये 46 टक्के पार्टिसिपेंट्समध्ये व्हिटॅमिन डीची लेव्हल कमी होती. परंतु, व्हिटॅमिन डी सप्लिमेंटचं सेवन 6 महिन्यानंतर त्यांच्या टिश्यूमध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतं गेलं. 

टिप : वरील सर्व गोष्टी संशोधनातून सिद्ध झाल्या असून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Vitamin d supplementation stops the progression of type 2 diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.