तुमच्या हात आणि पायांना झिणझिण्या येतात का? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:05 PM2023-04-04T12:05:17+5:302023-04-04T12:06:33+5:30

Problem Of Tingling In Fingers: हात आणि पायांच्या बोटांमध्ये झिणझिण्या येण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. जसे की, आहारात पोषक तत्वांची कमतरता, नसा आणि हाडांचे रोग इतरही काही आजार. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं याचं एक कारण ठरू शकतं. 

Vitamin deficiency causes tingling in fingers of hands and toes | तुमच्या हात आणि पायांना झिणझिण्या येतात का? जाणून घ्या यामागचं कारण...

तुमच्या हात आणि पायांना झिणझिण्या येतात का? जाणून घ्या यामागचं कारण...

googlenewsNext

Problem Of Tingling In Fingers: हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येणं हे शरीरात एक व्हिटॅमिन कमी होण्याचा संकेत आहे. ही एक सामान्य समस्या असू शकते जी हात आणि पायांच्या बोटांच्या जॉइंट्समध्ये सूजेचं कारण ठरते. त्याशिवाय हात आणि पायांच्या बोटांमध्ये झिणझिण्या येण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात. जसे की, आहारात पोषक तत्वांची कमतरता, नसा आणि हाडांचे रोग इतरही काही आजार. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं याचं एक कारण ठरू शकतं. 

व्हिटॅमिन डी का गरजेचं आहे?

व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं असतं. व्हिटॅमिन डी चं मुख्य काम आपली हाडे आणि मासपेशींना निरोगी ठेवणं. हे व्हिटॅमिन सूर्यकिरणे आणि फिश, दूध तसेच अंडी यातून मिळतं. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झालं तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. त्या कोणत्या हे जाणून घेऊ...

1. रिकेट्स : ही समस्या लहान मुलांमध्ये होते आणि त्यांच्या हाडांच्या विकासावर याने प्रभाव पडतो. 

2. ऑस्टिओपोरोसिस : ही समस्या जास्त वयाच्या लोकांमध्ये होते. त्यांची हाडे खूप कमजोर होतात.

3. न्यूरोमस्कुलर समस्या : व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर शरीराच्या मांसपेशींच्या विकासावरही परिणाम होतो. ज्यामुळे मांसपेशी कमजोर होतात.

4. डिप्रेशन आणि अधिक थकवा : व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर अधिक थकवा आणि डिप्रेशनची समस्या होऊ शकते. 

कमतरता कशी कराल पूर्ण?

मशरूम - मशरूममध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं. जास्तीत जास्त प्रकारच्या मशरूमच्या खाद्य पदार्थांमध्ये जास्त व्हिटॅमिन असतं.

सूर्यकिरणे - सूर्याची किरणे व्हिटॅमिनचा सगळ्यात चांगला सोर्स मानले जातात. सकाळच्या कोवळ्या उन्हात थोडा वेळ थांबल्यावर तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकतं.

दूध - दुधातही व्हिटॅमिन डी भरपूर असतं. रोज एक कप दूध प्याल तर तुम्हाला  आवश्यक तेवढं व्हिटॅमिन डी मिळतं.

सूर्यफुलाचं तेल - सूर्यफुलाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन डी चं प्रमाण भरपूर असतं. या उपयोग खाण्यासाठी नाही तर त्वचेवर लावण्यासाठी केला जातो.

Web Title: Vitamin deficiency causes tingling in fingers of hands and toes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.