'हे' आहे हाडांमध्ये फ्रॅक्चर येण्याचं मुख्य कारण, जगभरात याने होतात ९ मिलियन फ्रॅक्चर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 11:24 AM2019-11-22T11:24:36+5:302019-11-22T11:30:43+5:30
इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात साधारण २०० मिलियन महिला या आजाराच्या शिकार होतात.
ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांसंबंधी एक असा आजार ज्यात हाडे कमजोर होतात. आणि यामुळेच हलक्या झटक्याने किंवा जखमेमुळे फ्रॅक्चर होण्याचा धोका अधिक वाढतो. इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात साधारण २०० मिलियन महिला या आजाराच्या शिकार होतात. तर एका ताज्या रिसर्चनुसार, केवळ यूरोप, यूके आणि जपानमध्ये दरवर्षी साधारण ७५ मिलियन लोक ऑस्टिओपोरोसिसच्या समस्येशी लढत असतात. यात महिला आणि पुरूष दोघांचाही समावेश आहे.
इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशनच्या अंदाजानुसार, दरवर्षी जगभरात ९ मिलियन फ्रॅक्चरचं कारण ऑस्टिओपोरोसिस आजार असतो. दरवर्षी साधारण २५ टक्के हिप फ्रॅक्टर याच आजारामुळे होतात. या आजाराने ग्रस्त असलेल्या पुरूषांमध्ये हिप फ्रॅक्चर मृत्यूचं मुख्य कारण आहे. ऑस्टिओपोरोसिसचे शिकार असलेल्या पुरूषांमध्ये हिप फ्रॅक्टरनंतर पहिल्या १२ महिन्यात मृत्यू दर जवळपास २० टक्के आहे.
या आकडेवारीच्या आधारावर असं मानलं जाऊ शकतं की, जगभरातील महिला आणि पुरूषांना आयुष्यभर हाडांच्या आरोग्यावरही पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी योग्य तो आहार घेणे, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करणे, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खाणे तसेच रूटीन फॉलो करणे गरजेचे आहे.
एका नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जे लोक हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करतात, त्यांना हा आजार होण्याचा धोका कमी असतो. पण रिसर्चमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, केवळ इतकंच करून या आजारापासून बचाव होऊ शकत नाही. कारण हाडे मजबूत ठेवण्यासाठी दुसरे इतरही न्यूट्रिएंट्स कंपाउंड्सही महत्वाची भूमिका बजावतात.
(Image Credit : medicalnewstoday.com)
या कंपाउंड्सचं सेवन केल्यानेच हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. या कंपाउंड्स म्हणजेच तत्वांमध्ये व्हिटॅमिन के २, व्हिटॅमिन डी, कोलेजन पेप्टाइड्स आणि मॅग्नेशिअमसारखे तत्व असतात. जेव्हा यातील कोणतेही तत्व शरीराला मिळणं बंद होतात, तेव्हा हाडे कमजोर होऊ लागतात.