जाड कंबर असलेल्यांना असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, घरीच टेस्ट करून जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:16 PM2023-08-25T12:16:20+5:302023-08-25T12:16:57+5:30

Heart Disease: एका फ्री टेस्टमच्या माध्यमातून तुम्ही घरीच माहीत करून घेऊ शकता की, तुम्हाला हृदयरोगाचा धोका आहे किंवा नाही.

Waist size can determine your risk of heart disease in men and women | जाड कंबर असलेल्यांना असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, घरीच टेस्ट करून जाणून घ्या...

जाड कंबर असलेल्यांना असतो हार्ट अटॅकचा अधिक धोका, घरीच टेस्ट करून जाणून घ्या...

googlenewsNext

Heart Disease:  हार्टसंबंधी आजार हे जगभरात मृत्यूच्या सगळ्यात मोठ्या कारणांपैकी एक आहे. अनेक कारणांमुळे हृदयरोगांचा धोका वाढतो. यात हाय कोलेस्ट्रॉल आणि हाय ब्लड प्रेशर यांचा समावेश आहे. ब्रिटिश हार्ट फाउंडेशननुसार, एका फ्री टेस्टमच्या माध्यमातून तुम्ही घरीच माहीत करून घेऊ शकता की, तुम्हाला हृदयरोगाचा धोका आहे किंवा नाही.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने सांगितलं की, तुमच्या कंबरेचा घेर मोजून तुम्हाला हृदयासंबंधी आजाराचा धोका किती आहे हे जाणून घेऊ शकता. जास्त वजन किंवा लठ्ठपणा वाढल्याने हृदयरोग आणि डायबिटीसचा धोका असतो. तुमचा बॉडी मास इंडेक्स हे सांगण्याची पद्धत आहे की, तुमचं वजन अधिक आहे की तुम्ही लठ्ठ आहात. सामान्यपणे 25 किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआयचा अर्थ आहे की, तुमचं वजन जास्त आहे आणि 30 पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या श्रेणीत ठेवलं जातं.

ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने सांगितलं की, बीएमआय हृदयासंबंधी आजारांना कमी करण्याचा एकमेव उपाय नाही. तुमच्या शरीराच्या मध्य भागाच्या आजूबाजूला जास्त वजन किंवा फॅट जमा झाल्याने हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

सामान्यपणे जर एखाद्या पुरूषाची कंबर 94 सेमी म्हणजे 37 इंचापेक्षा जास्त असेल किंवा महिलेची कंबर 80 सेमी म्हणजे 31.5 इंचापेक्षा जास्त असेल तर त्यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. सामान्यपणे शरीराच्या मध्यभागी वजन जास्त असण्याचा अर्थ हा आहे की, तुमच्या शरीरात जास्त विसरल फॅट आहे. बीएचएफचं मत आहे की, विसरल फॅट तुमच्या लिव्हर आणि अग्नाशयाच्या आजूबाजूला जमा होतं. जे फार घातक आहे.

विसरल फॅटमुळे विषारी पदार्थ तयार होतात जे शरीराच्या काम करण्याच्या पद्धतीला प्रभावित करतं. याने शरीरासाठी इन्सुलिन हार्मोनचा वापर करणं अवघड होतं. जे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतो. यामुळे टाइप 2 डायबिटीस होऊ शकतो. रक्तात जास्त ग्लूकोज असेल तर याने धमण्यांचं अधिक नुकसान होतं. यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

टेपने कंबर मोजताना काय काळजी घ्यावी

- टेप बेंबीच्या खाली ठेवावी.

- कंबर मोजताना याची काळजी घ्या की, टेप चांगला टाइट केला असेल.

- कंबर मोजताना कपडे घालू नका.

- कंबर मोजताना श्वास रोखून ठेवा.

- एकदा कन्फर्म करण्यासाठी दुसऱ्यांदाही कंबर मोजा.

Web Title: Waist size can determine your risk of heart disease in men and women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.