वजन कमी करण्यासाठी रोज किती पावलं चालणं गरजेच आहे? जाणून घ्या वेट लॉसचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 05:17 PM2022-04-24T17:17:17+5:302022-04-24T17:34:58+5:30

दररोज काही वेळ चालून तुम्ही तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. पण काही लोकांना योग्य मार्ग आणि वेळ माहीत नसतं. आज जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

walk 10 thousand steps for weight loss | वजन कमी करण्यासाठी रोज किती पावलं चालणं गरजेच आहे? जाणून घ्या वेट लॉसचं रहस्य

वजन कमी करण्यासाठी रोज किती पावलं चालणं गरजेच आहे? जाणून घ्या वेट लॉसचं रहस्य

googlenewsNext

वजन कमी करण्यासाठी आपण विविध पर्यायांचा वापर करतो. वजन कमी करण्याच्या पर्यायांमधील एक उत्तम म्हणजे चालणं. म्हणजेच दररोज काही वेळ चालून तुम्ही तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करू शकता. पण काही लोकांना योग्य मार्ग आणि वेळ माहीत नसतं. आज जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

चालण्याची योग्य वेळ
जर तुम्हाला चालण्याने वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दररोज किमान दहा हजार पावलं चाललं पाहिजे. तरच तुमचं वजन कमी होईल. दहा हजार पावलं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सुमारे ४० मिनिटं लागतील. 

१० हजार पावलं चालताना सुरुवातीला अडचणी येतील. पण तुमच्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज किमान इतकी पावलं चालणं आवश्यक आहे. एकदा का तुम्हाला याची सवय झाली की तुम्ही १२ ते१५ हजार पर्यंत पावलं वाढवू शकता.

विशेषतः ज्या व्यक्ती जास्त वेळ बसून काम करत नाहीत आणि इतर कोणतीही शारीरिक क्रिया करत नाहीत त्यांच्यासाठी चालणं जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे शक्यतो कामाच्या दरम्यान पाच ते दहा मिनिटं चालावं. तसंच लिफ्टऐवजी जिने वापरण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या शरीरातून फॅट बर्न करण्यास सुरुवात होईल. 

लक्षात ठेवा की संधिवात, दमा आणि हृदयाच्या रुग्णांनी कोणताही फिटनेस प्रोग्राम, व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Web Title: walk 10 thousand steps for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.